बेफिकीर वृत्तीमुळे प्रवाशांचे मास्ककडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:00 AM2021-02-03T00:00:14+5:302021-02-03T00:04:56+5:30
नाशिक : कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले असून, ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण, हे एसटीचे घोषवाक्यदेखील धाब्यावर बसवित अनेक जण विनामास्क प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे.
नाशिक : कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले असून, ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण, हे एसटीचे घोषवाक्यदेखील धाब्यावर बसवित अनेक जण विनामास्क प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने कंबर कसलेली आहे. याचाच एक भाग म्हणून एस.टी. महामंडळाकडून आपल्या बसेसवर ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण असे घोषवाक्य लिहून जनजागृती केली जात आहे; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांसह चालक व वाहकसुद्धा या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. यापुढे मास्कशिवाय बसमध्ये खरोखर प्रवेश नाकारल्यास प्रवासी गांभीर्याने घेतील, असे बोलले जात आहे.
थंडीमुळे मी नेहमीच मफलरचा वापर करतो. कोरोनाची महामारी आल्यापासून त्याच मफलरचा मास्क म्हणून उपयोग करतो; परंतु आज तालुक्याला महत्त्वाचे काम असल्यामुळे घाईत निघाल्याने मास्क घरीच विसरलो. यापुढे मी नक्कीच काळजी घेणार असून, सर्व नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर न पडण्याचा निश्चय करावा.
- मास्क न घातलेला प्रवासी. त्र्यंबकेश्वर
सध्या अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आम्ही जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी तसेच उत्सव, लग्नकार्य आदी ठिकाणी मास्क लावत असून, काळजी घेत असतो. प्रवासात एक सीट सोडून अंतर ठेवून बसत सॅनिटायझर स्प्रेचा वापर करत असतो. त्यामुळे आज मास्कचा वापर केला नाही.
- मास्क न घातलेला प्रवासी, नांदूरवैद्य.
कोरोनाचा संसर्ग आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तो जवळपास गेल्यातच जमा आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी मास्क वापरण्यापेक्षा जास्त गर्दीच्या वेळेसच मी मास्क लावते. एखाद्यावेळी घाईत निघाल्यामुळे मास्क घरीच विसरते. यापुढे मास्कशिवाय बाहेर निघणार नाही. माझ्यासह इतरांचीही काळजी घेणार आहे.
- मास्क न घातलेला प्रवासी, पिंपळगाव बसवंत