वाहन तपासणीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 06:50 PM2019-11-30T18:50:03+5:302019-11-30T18:50:27+5:30
कळवण : वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सिर्टिफकेट-पीयूसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मनोज देवरे
कळवण : वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सिर्टिफकेट-पीयूसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून ही चाचणी करण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र मालेगाव विभागात फक्त तीनच पीयूसी सेंटर असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
शहरासह ग्रामीण भागात वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. वाहनांमुळे प्रदूषण हि मोठ्या प्रमाणात होत असून धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. वाहनाने दहा हजार किलोमीटरची मर्यादा ओलांडल्यानंतर पीयूसी करणे बंधनकारक असले तरी त्याकडे वाहनचालक कानाडोळा करत असल्याचे चित्र असून उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
हि वाहने धावतायेत रस्त्यावर
वाहनांचा प्रकार वाहनांची संख्या
दुचाकी ३३४५८०
कार आण िजीप ३०१५८
आॅटोरिक्षा ३९८७
ट्रक ५५८८
ट्रॅक्टर ३०६३७
ट्रेलर्स २०१८१
स्कुल बस २७६
टँकर्स २१२
टेम्पो,जेसीबी,अँब्युलन्स १५०१८
बस ६६
टॅक्सी १४९७
एकूण ४,४७,६००
प्रदूषित वाहने तपासणीचे दर-
मोटार वाहन अधिनियम १८९९ मधील तरतुदीनुसार मोटार वाहनांची वायू तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू तपासणी केंद्रांना देण्यात आले आहे.याप्रमाणे दुचाकीसाठी ३५ रु पये, तीनचाकी ७० चारचाकी ९०, डिझेलवरील वाहने ११० रु पये आकारणे आवश्यक आहे.
वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तीन ठिकाणी पीयूसी सेंटर असून तीन सेंटर प्रस्तावित आहेत.ड्रायिव्हंग स्कुल किंवा संस्था, व्यक्ती यांना पीयूसी सेंटर सुरु करायचे असल्यास त्यांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क करावा.
- किरण बिडकर, उपप्रादेशिक अधिकारी, परिवहन विभाग, मालेगाव.
वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या होत असून नागरिकांच्या आरोग्यासोबतच परिवारणालाही त्याची हानी पोहचत आहे. वाहनधारकांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून वाहनांची नियमित तपासणी करून घ्यावी. उपप्रादेशिक विभागाने याबाबतीत लक्ष घालावे.
-डॉ. किशोर कुवर, अध्यक्ष महाराष्ट्र पर्यावरण विकास संस्था.