आयआयआयडीचे मार्चमध्ये तीन दिवसीय प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:49+5:302021-02-06T04:23:49+5:30
नाशिक : इंन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिजाइनर्स (आयआयआयडी) नाशिक शाखेतर्फे मार्च महिन्यात १९ ते २१ ‘डिजाइन कन्प्लूएन्स अँड शोकेस’ ...
नाशिक : इंन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिजाइनर्स (आयआयआयडी) नाशिक शाखेतर्फे मार्च महिन्यात १९ ते २१ ‘डिजाइन कन्प्लूएन्स अँड शोकेस’ हे राष्ट्रस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून नाशिकमधील गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि वास्तूवैभव देशभर पोहोचविण्याचा मानस असल्याचे आयआयआयडीच्या नाशिक शाखेच्या अध्यक्ष तरन्नुम काद्री यांनी पत्रकार परिषदेत सागितले.
आयआयआयडीतर्फे होणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील नामांकित वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकार आर्किटेक्ट आणि विविध विषयांवरील इंटेरिअर डिज़ाइनर्स सहभागी होणार असून जेष्ठ आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन , सादरीकरण, समूह चर्चा याबरोबरच अंतर्गत सजावटी संदर्भातील अत्याधुनिक उत्पादनांचे व डिझाइन्सचे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे १९ ते २१ मार्चदरम्यानन तीन दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात आर्किटेक्ट्स . इंटिरियर डिझायनर्स , रियल्टर्स, बांधकाम सेवा पुरवठादार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही उपयुक्त माहिती व मार्गदर्शक मिळणार आहे. आयआयआयडी च्या देशभरातील सुमारे ३३ शाखांचे देशपातळीवरील पदाधिकारी यात सहभागी होणार असून, त्यांच्या अनुभवांचा व माहितीचा नाशिक परिसरातील व्यावसायिकांनीही फायदा मिळणार असल्याचीे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सचिव अतुल बोहरा, आकाश कदम. हेमंत दुग्गड, वैशाली प्रधान, शीतल साखला, सचीन गांग, राकेश लोया कमल कोखाणी आदी उपस्थित होते.