इगतपुरी रेल्वे दवाखान्याची दुरावस्था ; सर्व पक्षीयांकडुन पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 08:21 PM2019-08-07T20:21:12+5:302019-08-07T20:21:58+5:30
इगतपुरी : शहरात रेल्वेचा १५० कॉटचा ब्रिटिशकालीन एकमेव मोठा दवाखाना असुन सध्या रेल्वे प्रशासनाने या दुर्लक्ष केल्याने या दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.या संदर्भात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दवाखान्याची नुकतीच पहाणी केली.
इगतपुरी : शहरात रेल्वेचा १५० कॉटचा ब्रिटिशकालीन एकमेव मोठा दवाखाना असुन सध्या रेल्वे प्रशासनाने या दुर्लक्ष केल्याने या दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.या संदर्भात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दवाखान्याची नुकतीच पहाणी केली.
एकेकाळी सर्व सोयीने युक्त असलेला दवाखान्याला मरगळ आली आहे. पुर्वी या दवाखान्यात तालुक्यातील सर्व रेल्वे कामगारांचा येथे इलाज होत असत. शहरात मोठ्या प्रमाणावर रेल्वे कामगार वसाहत होती. या दवाखान्यात रेल्वेत अपघात झालेल्या प्रवाशांवर व रेल्वे कामगारांवर मोठ्या प्रमाणात इलाज केला जात असे.
मात्र सध्या रेल्वे प्रशासनाने या दवाखान्याकडे दुर्लक्ष केल्याने या दवाखान्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याची माहीती रेल्वे कामगारांनी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना दिल्यावर त्यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली.
सदर दवाखान्याची बरीच दुरावस्था झाली असुन एकेकाळी सर्व प्रकारची सर्जरी होणाºया या दवाखान्यात मोजकेच डॉक्टर असल्याचे दिसले. दवाखान्याच्या समोरील पटांगणात मोठया प्रमाणात पाणी जमा होत असुन याकडे प्रशासन कधी लक्ष देईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन या दवाखान्यात तातडीनेसर्व सुविधा पुरवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगिरथ मराडे, इगतपुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजु पंचारीया, अल्पसंख्यक सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. युनुस रंगरेज, माजी शहराध्यक्ष वैभव सुर्वे, घोटी मर्चंटचे माजी व्हाइस चेअरमन सोमनाथ कडु आदी उपस्थित होते.