चोर कप्प्यातून बेकायदेशीर मद्याची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:02 PM2018-05-04T15:02:09+5:302018-05-04T15:02:09+5:30
साधारणत: नाशिकच्या सीमेवरूनच अवैध मद्याची तस्करी चोरी, छुप्या मार्गाने केली जात असून, आजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखो रूपये किंमतीचा मद्यसाठा पकडला आहे. केंद्र शासीत प्रदेशात निर्मित होणाऱ्या विदेशी मद्यावर कोणताही कर नसल्याने त्याच्या किंमती महाराष्टÑातील मद्याच्या तुलनेत अल्प आहेत,
नाशिक : गुजरातसह केंद्र शासीत प्रदेश लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यात दीव दमण, दादरा नगर हवेली या केंद्र शासीत प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विदेशी मद्याची तस्करी केली जात असल्याचे व त्यावर वारंवार कारवाई होत असतानाही मद्य तस्करांनी या अवैध धंद्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरूवात केली असून, गेल्या आठवड्यात मद्याची वाहतूक करणारे दोन वाहने ताब्यात घेतल्याचे समजतात आता टेम्पोमध्येच चोर कप्पा करून सुमारे तीन लाखाची मद्य वाहतूक करणारे वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे.
साधारणत: नाशिकच्या सीमेवरूनच अवैध मद्याची तस्करी चोरी, छुप्या मार्गाने केली जात असून, आजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखो रूपये किंमतीचा मद्यसाठा पकडला आहे. केंद्र शासीत प्रदेशात निर्मित होणाऱ्या विदेशी मद्यावर कोणताही कर नसल्याने त्याच्या किंमती महाराष्टÑातील मद्याच्या तुलनेत अल्प आहेत, त्यामुळे दादरा नगर हवेली, दीव दमण येथील मद्याची महाराष्टÑात व विशेषत: नाशिक जिल्ह्यात चोरी छुप्या मार्गाने विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. यात केंद्र शासीत प्रदेशाबरोबरच गुजरात राज्यातील काही तस्करांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. २८ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा व हरसूल येथे मध्यरात्री सापळा रचल्यानंतर दोन वाहने ताब्यात घेण्याची घटना ताजी असतानाच गुरूवार दि. ३ मे रोजी नाशिक तालुक्यातील वाघेरा-गिरणारे रस्त्याने येणाºया महिंद्रा कंपनीची जेनियो टेम्पो (क्रमांक एम. एच. ०४-एफ डी.३२३४) हा संशयास्पद वाटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी त्याची तपासणी केली. त्यात तीन लाख रूपये किंमतीचा बिअरचा साठा सापडून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनासह बिअरचा साठा असा सुमारे साडेसात लाख रूपयांचा माल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखालीा प्रभारी निरीक्षक प्रविण मंडलीक, दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, जवान विष्णु सानप, विलास कुवर, सुनील पाटील, पुनम भालेराव यांनी पार पाडली.