गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:47 PM2018-08-20T16:47:08+5:302018-08-20T16:47:27+5:30

मालेगाव : गिरणानदीला पुरपाणी सुरू असतानाही वाळु माफियांकडून शहरालगतच्या टेहरे व रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील नदी पात्रातुन अवैधरित्या बिनभोबाटपणे वाळुउपसा सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार महसुल विभागाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. महसुल विभागाच्या वरदहस्ताने वाळु चोरट्यांकडून दिवसाढवळ्या वाळु चोरी केली जात आहे.

 Illegal liquor pots from Girna river bed | गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा

गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा

Next
ठळक मुद्देमालेगाव : महसुल विभागाचे दुर्लक्ष; कारवाईची मागणी 

मालेगाव : महसुल विभागाचे दुर्लक्ष; कारवाईची मागणी 
मालेगाव : गिरणानदीला पुरपाणी सुरू असतानाही वाळु माफियांकडून शहरालगतच्या टेहरे व रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील नदी पात्रातुन अवैधरित्या बिनभोबाटपणे वाळुउपसा सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार महसुल विभागाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. महसुल विभागाच्या वरदहस्ताने वाळु चोरट्यांकडून दिवसाढवळ्या वाळु चोरी केली जात आहे.
तालुक्यातील गिरणा व मोसमनदी पात्रातुन वाळु चोरीचे प्रकार महसुल विभागाला थांबविता येत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सर्रास अवैध वाळु उपसा सुरू आहे. सध्या मोसम व गिरणा नदीला पुरपाणी सुरू आहे. अशा परिस्थितीत वाळु उपसा करता येत नाही. यावर वाळु चोरट्यांनी मात करत शहरालगतच्या टेहरे शिवारात अवैध वाळु उपसा सुरू केला आहे. सकाळच्या सत्रात बैलगाडी व ट्रॅक्टरमधुन सर्रास वाळु उपसा होत आहे. शेतकºयांच्या विरोधाला न जुमानता सर्रास वाळु उपसा केला जात आहे.
नदी किनारी असलेल्या विहिरीवरील शेतीपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांनी महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना वाळुचोरीची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर थातुर मातुर कारवाई केली जाते. तालुक्यातील नदीपात्रातुन तसेच वन जमिनीतुन सर्रासपणे वाळु, मुरुम, दगड आदिची वाहतूक केली जात आहे. वाळु उपसा प्रतिबंधक पथकाकडूनही कारवाई केली जात नसल्यामुळे वाळुमाफियांचे धारिट्य वाढले आहे. सवंदगाव शिवार, गिरणानदी पात्र, मोसमनदी पात्र, वनविभागाच्या जंगलांमधुन सर्रासपणे गौणखनिजाची वाहतूक केली जात आहे. महसुल विभागाच्या वरदहस्तामुळे गौणखनिज चोरीला जात आहे. वाळु माफियांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title:  Illegal liquor pots from Girna river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.