लॉकडाऊन काळात लॉजमधून बेकायदेशीर मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:40 PM2020-03-29T16:40:21+5:302020-03-29T16:40:47+5:30
पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नाशिक : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंची दुकाने बंद के ली आहेत. मद्यविक्रीही पुर्णपणे थांबविण्यात आली आहे. तरीदेखील चोरट्या मार्गाने मद्यविक्रीचे आटोकाट प्रयत्न सुरू असून पंचवटी पोलिसांनी दुसऱ्यांदा अशाप्रकारचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मालेगाव स्टँड येथील एका लॉज मध्ये बेकायदेशीररित्या ठेवलेला मद्यसाठा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी, मालेगाव स्टँड येथे असल्याने हॉटेल न्यू पंजाब अँड बोर्डिंग येथे बेकायदेशीर मद्यविक्र ी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली त्यानुसार पोलिस पथकाने दुपारी छापा टाकला असता त्या लॉज मध्ये विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. पंचवटी पोलिसांनी मद्यसाठा जप्त करत संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित आकाश संदीप शर्मा व दुकान कामगार देवराज अशोक देवकाते या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम (६५) ई सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधात्मक कलमानुसार कारवाई करून त्यांना अटक केली आहे.