्नराज्य महामार्गावर अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:53 PM2019-04-26T17:53:24+5:302019-04-26T17:53:42+5:30
जायखेडा : जायखेडा पोलिसांनी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहराबाद चौफुलीवर सुरु असलेल्या नाकाबंदी दरम्यान महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारा ११ हजार ९७० रु पयाचा अवैध मद्यसाठा व वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला ७ लाख रु पये किमतीचा ट्रक असा ७ लाख ११ हजार ९७० रु पये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर जायखेडा पोलिसांमार्फत ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे. याठिकाणी येणाऱ्या जाणाºया वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, काल मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकची (जी जे २७ व्ही ६३९९) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश साळवे, निकेश कोळी, एच. व्ही. अहिरे, घोडके आदींनी तपासणी केली. यावेळी सदर ट्रकमध्ये विदेशी कंपनीच्या ७५० मिलीच्या ११ हजार ९७० रु पये किमतीच्या २१ बाटल्या आढळून आल्या.
याप्रकरणी विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाºया शिवनरेश गुरु दयाल बघेल (रा. अमेर नगर, अहमदाबाद) व संदीप शिवाजी चव्हाण (रा. सरसपूर, अहमदाबाद) यांना ट्रकसह ताब्यात घेतले असून जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.