जमिनीवर बेकायदा कब्जा; कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:52 AM2018-10-29T00:52:02+5:302018-10-29T00:52:34+5:30
दलित समाजास शासनाने उपजिविकेसाठी वाटप केलेल्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या कब्जा करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नाशिकरोड : दलित समाजास शासनाने उपजिविकेसाठी वाटप केलेल्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या कब्जा करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पिपल्स रिपाइंच्या वतीने विभागीय उपआयुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळा तालुक्यातील मौजे फुलेनगर येथील भूमिहीन दलितांना शासनाकडून जमिनीचे वाटप कागदोपत्री करण्यात आले. मात्र काही जणांनी त्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. याबाबत अनेक वर्षांपासून संबंधित नागरिक प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दलितांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने उपजिविकेसाठी दिलेल्या जागाच बळकवण्यात आल्याने त्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कागदोपत्री दिलेल्या जागा संबंधितांना कब्जासह देण्यात याव्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर पिपल्स रिपाइंचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे, कैलास पगारे, नितीन पगारे, नवनाथ कातकाडे, जयश्री वाघ, विलास खरात, अरुण मोरे, शांताराम जमदाते, शिवाजी तायडे, बलाबाई गोसावी, बापूभाऊ निरभवणे, मागीलाल मोरे, दादाजी मल्हे, रवींद्र आहिरे, धनराज पवार, भाऊसाहेब गोसावी, कैलास जमदारे आदींच्या सह्या आहेत.