देशमाने परिसरात अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:13 PM2020-02-07T22:13:16+5:302020-02-08T00:08:14+5:30

सोन्याच्या दरात वाळू विकली जात असल्याने वाळूचोरांची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र सध्या मानोरी परिसरातील गोई नदीपात्र परिसरात दिसत आहे. यामुळे वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Illegal sand consumed by the countryside | देशमाने परिसरात अवैध वाळू उपसा

गोई नदीपात्रात दिवसा मजुरांकडून वाळूचे ढीग घालून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या साह्याने वाहून नेली जाते.

Next
ठळक मुद्देसंबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी

देशमाने : सोन्याच्या दरात वाळू विकली जात असल्याने वाळूचोरांची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र सध्या मानोरी परिसरातील गोई नदीपात्र परिसरात दिसत आहे. यामुळे वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तीन ते चार हजार रु पये प्रतिब्रास दर मिळत असल्याने वाळूचोरांचे पेव फुटलेले दिसून येत आहे, तर अनेक शेतकरी वाळूमाफियांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना अवैध वाळू वाहतुकीस शेतातून रस्ता देऊन सहकार्य करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई झाल्यास वाळूचोर उघडे पडतील, अशी अपेक्षा आहे. घरकुल, शौचालय, गायगोठा किंवा तत्सम बांधकामासाठी वाळूची नितांत गरज आहे; परंतु रितसर मागणी करून सामान्यांना परवाना मिळत नसल्याने वाळूचोरांची पाठराखण प्रशासनाकडून होत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Illegal sand consumed by the countryside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.