अवैध वाळू उपशामुळे पाणीटंचाईचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 05:05 PM2020-03-01T17:05:26+5:302020-03-01T17:06:06+5:30

नामपूर : शहरात राजरोसपणे सुरू असणाऱ्या वाळू उपशाकडे पोलिसांकडून डोळेझाक होत असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा धोका निर्माण झालेला आहे. एरवी अवैध वाहतूक व हातगाडी विक्रेत्यांवर कायद्याचा बडगा उगारणाºया पोलिसांना मोसम नदीपात्रातून रात्रभर होणारा अवैध वाळू उपसा, रोडरोमिओंकडून शहरात होत असलेली छेडछाड व वाढत्या चोरीच्या घटना दिसत नाहीत का असा प्रश्न नामपूरवासियात उपस्थित होत आहे. या घटनांना आळा न घातल्यास महाराष्टÑदिनी आक्रमक पवित्रा घेतला जाईल, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रातीदलाचे शहराध्यक्ष राजेंद्र पंचाळ व मोसम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश खरोटे यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहे.

Illegal sand drought risks water scarcity! | अवैध वाळू उपशामुळे पाणीटंचाईचा धोका !

अवैध वाळू उपशामुळे पाणीटंचाईचा धोका !

Next

यंदा पावसाळा उत्तम झाल्याने नदी दुथडी भरून वाहिली. वाळूच्या प्रमाणातही वाढ झाली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला होता. मोसम नदीवर भाजप- सेना सरकारच्या कारकिर्दीत केटीवेअर झाले. यामुळे नामपूरचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. शिवाय ग्रामपंचायतीने नविन विहिर खोदल्यामुळेही नामपूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ लागला. मात्र आता पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मोसम नदीपात्रातूनच वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. मध्यंतरी वाळू उपसा बंद झाला होता, आता मात्र पुन्हा जोमात सुरू झालेला आहे. घरकामासाठी सायकलीवर थोडी-फार वाळू नेणा-या सामान्य नागरिकांना धमकावून पोलीस ठाण्यात नेले जाते. मात्र राजरोस अवैध वाळू वातूक करणाऱ्यांकडून पोलीस व महसूल खात्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडे तक्रार करायची म्हटली तर चौकी सातत्याने बंद असते व नागरिकांना पोलिसांच्या भेटीसाठी तासन्तास तिष्ठत बसावे लागते. या वाळू उपशाकडे प्रशासनाचे असेच दुर्लक्ष राहिल्यास जलस्त्रोत संपुष्टात येईल व दहा वर्षापूर्वी नागरिकांना पाणीटंचाईला जसे सामोरे जावे लागले, तोच धोका आता पुन्हा निर्माण होतो की काय अशी भीती वर्तविण्यात येत आहे.

 

Web Title: Illegal sand drought risks water scarcity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.