मालेगावी लिलाव नसताना बेकायदा वाळू उपसा

By admin | Published: January 28, 2015 11:54 PM2015-01-28T23:54:22+5:302015-01-29T00:01:25+5:30

मालेगावी लिलाव नसताना बेकायदा वाळू उपसा

Illegal sand extraction without auctioned Malegavi | मालेगावी लिलाव नसताना बेकायदा वाळू उपसा

मालेगावी लिलाव नसताना बेकायदा वाळू उपसा

Next

मालेगाव : लिलाव झालेला नसताना येथील गिरणा व मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असल्याने नदीकाठच्या विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यात गेल्या वर्षी एकाच ठिकाणचा वाळू लिलाव झालेला असताना दोन्ही नदीपात्रातील वाळू नाहीशी झालेली आहे. त्यामुळे या वाळूची चोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
येथील गिरणा नदीपात्रातील दाभाडी, रोकडोबा आदि ठिकाणी रात्रभर वाळूचा उपसा करून सोयगाव, कॅम्प, नववसाहत भागात वाळू टाकण्यात येत आहे. चंदनपुरी, म्हाळदे आदि ठिकाणी वाळूचा उपसा करून ती शहरासह इतर भागात वाहिली जात आहे. सुमारे सहा महिन्यापासून वाळू लिलाव बंद असूनही शहरात वाळूचा तुटवडा जाणवत नाही. महसूलच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याने संबंधित कर्मचारी त्याकडे काणाडोळा करत असल्याची वास्तविकता आहे. ग्रामीण भागात वाळू रक्षणाची जबाबदारी तलाठी व ग्रामपंचायतीवर आहे. मात्र काळाच्या ओघात सोन्याचे अंडे ठरलेल्या वाळू व्यवसायात सर्वांचेच आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने कुंपनच शेत खाऊ लागले आहे. त्यातूनच वाळूची चोरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal sand extraction without auctioned Malegavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.