वडाळागाव परिसरात अवैध प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:48 PM2019-05-10T23:48:58+5:302019-05-11T00:05:01+5:30
वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.
इंदिरानगर : वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.
वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखली जात, सुमारे १२ हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जिनतनगर, पिंगुळी बाग, यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव करतात. त्यांना कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी बससेवेअभावी रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यासाठी नागरिकांना मांगीरबाबा चौक येथून रिक्षात बसावे लागते. सदर रिक्षा हनुमान मंदिर खंडोबा चौक यामार्गे गल्लीबोळातून मार्गक्र मण बेफान वेगाने आणि अवैध प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. सदर रिक्षाचालकांना भान नसते की, आपण गल्ली बोळातून वाहन चालवत आहे. त्यामुळे लहान मुलांची अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने गल्लीबोळातून रिक्षा वाहतूक बंद करून मुख्य रस्त्यांनी आणि वेगमर्यादेचे भान ठेवून रिक्षाचालकांना वाहतूक करण्याची शिस्त लावावी तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
वडाळागावात अद्यापही शहर वाहतूक बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नाईलाजाने गावातील नागरिकांना रिक्षांनी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सिटांवर सहा ते सात आणि रिक्षाचालकाशेजारी तीन ते चार प्रवासी बसलेले असतात रिक्षाचालकांकडे वाहन परवाना आणि गणवेश नसल्याचे नागरिकांची तक्र ार आहे. तसेच शंभरफुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात दुतर्फा रस्त्यावर रिक्षा उभा करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.