अवैध वाहतूक : १९ लाखांचा चार हजार किलो सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:16 PM2020-06-19T23:16:04+5:302020-06-19T23:20:36+5:30
नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राऊ चौकी जवळ नाकाबंदी दरम्यान बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुमारे 19 ...
नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राऊ चौकी जवळ नाकाबंदी दरम्यान बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुमारे 19 लाख रुपयांची अंदाजे 4 हजार किलो सुगंधित तंबाखू माल पकडला आहे.
शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी सुरू असतांना पोलिसांना (एमएच 10 ए क्यू 6140) चारचाकी ट्रक संशयास्पद जातांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू भरलेली असल्याचे निष्पन्न झाले याबाबत पोलिस ठाण्यात माहिती कळविण्यात येऊन सदर ट्रक पोलिस ठाण्यात नेण्यात आला.पोलिस ठाण्यात सदर ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सुगंधित तंबाखू पोते आढळून आले. पोलिसांनी सुगंधित तंबाखू माल, चारचाकी वाहन तसेच चालकासह दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. सुगंधित तंबाखू व वाहन असा जवळपास 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सांगितले.