जनावरांच्या हाडांची बेकायदा वाहतूक

By admin | Published: June 14, 2015 11:17 PM2015-06-14T23:17:08+5:302015-06-14T23:41:55+5:30

तिघांवर गुन्हा दाखल

Illegal transport of animals bone | जनावरांच्या हाडांची बेकायदा वाहतूक

जनावरांच्या हाडांची बेकायदा वाहतूक

Next

येवला : दुर्गंधीयुक्त जनावरांचे मांस व हाडे बेकायदेशीररीत्या
मालेगाव व येवला येथून भरून कोपरगावकडे वाहतूक करणाऱ्या गाडीसह तीन जणांविरुद्ध येवला शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे.
येवला कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल रेल्वे गेटजवळ पो. कॉ. काशीनाथ देवरे हे गस्त घालत असताना, त्यांना दुर्गंधीयुक्त मांस व हाडे येवल्याकडून कोपरगावकडे जाणाऱ्या एमएच २८ एच-७४७८ या पिकअप गाडीसह सलीम खान इस्माईल खान (४७), रा. कमालपुरा, मालेगाव, जि. नाशिक; सय्यद अकिल सय्यद लतीफ (२८), रा. मर्चंटनगर, मालेगाव, व पिकअप गाडीचालक मोहम्मद गुलजार मोहम्मद अख्तर (३२), रा. मेतुलकुराण मदरसा, मालेगाव, जि. नाशिक यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख ५० हजार रु पयांची पिकअप गाडी व १५ हजार रु पये किमतीचे अंदाजे दीड टन वजनाचे मांस व हाडे जप्त केली असून, त्यांच्यावर प्राणी परीरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अभिमन्यू अहेर करीत्
आहेत. गेल्या आठवड्यात या संबंधातील दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Illegal transport of animals bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.