ऑनलाइन मैत्रीचा भास अन् लाखोंच्या फसवणुकीचा फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:41 AM2020-12-04T04:41:09+5:302020-12-04T04:41:09+5:30
‘टुली मॅडली’ नावाच्या डेटिंग ॲप्लिकेशनद्वारे या महिलेने येथील एका व्यापाऱ्यासोबत मैत्री करत ऑनलाइन चॅटिंग सुरू केले. तिने स्वत:ला ॲमस्टरडॅम, ...
‘टुली मॅडली’ नावाच्या डेटिंग ॲप्लिकेशनद्वारे या महिलेने येथील एका व्यापाऱ्यासोबत मैत्री करत ऑनलाइन चॅटिंग सुरू केले. तिने स्वत:ला ॲमस्टरडॅम, नेदरलॅण्ड येथे राहत असल्याचे भासविले. तेथील बोरटॅड फार्मास्युटिकल नावाच्या कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. तेथील ती नोकरी करत असलेल्या कंपनीमध्ये ‘रॉ मटेरियल’ची गरज असल्याचे सांगितले. सुरुवातीला फिर्यादी यांनी सहा लिटर ऑइल मोनिकाच्या सांगण्यावरुन कुरियरद्वारे मागविले. त्यानंतर मोनिकाने पुन्हा संपर्क साधत २०० लिटर ऑइल ऑर्डर त्यांना दिली आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी रक्कम भरण्यास सांगून तब्बल १९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निशाणदार म्हणाले. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, देवराज बोरसे यांना याप्रकरणी तत्काळ पथक दिल्लीला पाठविण्याचे आदेश निशाणदार यांनी दिले. तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेत उपनिरीक्षक दानिश मन्सुरी यांचे पथक राहुल जगझाप, अंकित निकम, भूषण देशमुख यांना दिल्लीला रवाना केले. या पथकाने दिल्ली येथील उत्तमनगरमधील बँकांवर लक्ष केंद्रित करत तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
---इन्फो--
प्रथमच नायजेरियन गुन्हेगाराला बेड्या
ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीमध्ये बहुतांश व्यक्ती नायजेरियन असल्याचे अनेकदा समोर येते. नाशिक शहराच्या सायबर पोलिसांनी मागील अनेक वर्षांनंतर प्रथमच या गुन्ह्यात संशयित विक्टर डॉमिनिक ओकन (४२,रा.पिल्लार नवी दिल्ली), त्याचा साथीदार पवनकुमार हरकेश बैखा (२४,रा. झुणी बस्ती, नजाफगड, दक्षिण-पश्चुिम दिल्ली) यांना शिताफीने अटक केली. त्यांचे काही साथीदार अजूनही पोलिसांच्या रडारवर असून, पुन्हा पथक दिल्ली गाठणार आहे.
--कोट--
कुठल्याहीप्रकारच्या ॲप्लिकेशनचा व्यावसायिक वापर करताना अधिक खबरदारी व सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कथित मोनिकासारख्या अनेक महिला केवळ मैत्रीचा भास निर्माण करून आर्थिक फसवणुकीचा ‘फास’ फेकत असतात, हे नागरिकांनी लक्षात घेणे काळाची गरज आहे, त्याशिवाय सायबर गुन्हेगारीला आळा बसणार नाही.
- संग्रामसिंह निशाणदार, उपायुक्त, गुन्हे शाखा
---
फोटो आर वर०३ सायबर नावाने सेव्ह आहे.