आरोग्य जागृतीसाठी दुचाकीवर देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:02 AM2018-09-15T00:02:57+5:302018-09-15T00:21:13+5:30

प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा बालपण व शिक्षणात खर्च होतो तर दुसरा नोकरी व संसारात स्थिरस्थावर होण्याचा असतो. या दुसऱ्या संघर्षमय टप्प्यात मनुष्य इतका व्यस्त होऊन जातो की, स्वत:च्या आरोग्याकडेही तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, परिणामी अखेरच्या टप्प्यातील व्याधीवर उपचार करण्यात आयुष्यभराची पुंजी खर्च करावी लागते. ही वेळ कोणावरही येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य जागृतीचा संदेश देण्यासाठी मी दुचाकीवर भारतभ्रमंती करीत असल्याचे दिल्ली येथील शरत शर्मा यांनी सांगितले.

Illusion of two-wheeler for health awareness | आरोग्य जागृतीसाठी दुचाकीवर देशभ्रमंती

आरोग्य जागृतीसाठी दुचाकीवर देशभ्रमंती

Next
ठळक मुद्देशरत शर्मा यांचा उपक्रम नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर ‘लोकमत’ला भेट

नाशिक : प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा बालपण व शिक्षणात खर्च होतो तर दुसरा नोकरी व संसारात स्थिरस्थावर होण्याचा असतो. या दुसऱ्या संघर्षमय टप्प्यात मनुष्य इतका व्यस्त होऊन जातो की, स्वत:च्या आरोग्याकडेही तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, परिणामी अखेरच्या टप्प्यातील व्याधीवर उपचार करण्यात आयुष्यभराची पुंजी खर्च करावी लागते. ही वेळ कोणावरही येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य जागृतीचा संदेश देण्यासाठी मी दुचाकीवर भारतभ्रमंती करीत असल्याचे दिल्ली येथील शरत शर्मा यांनी सांगितले.
आयुष्याची निम्मी वर्ष$ं प्रसिद्धी माध्यमात घालवून निवृत्त झालेल्या शर्मा यांना समाजात आरोग्याबद्दलची जी बेफिकिरी दिसून आली, ती दूर होण्यास हातभार लागावा यासाठी देशभ्रमंती करण्याचा निश्चय त्यांनी केला. आपल्या मोटारबाइकवरून २३ राज्यांची सैर केल्यानंतर शुक्रवारी नाशिकमध्ये आले असता शर्मा यांनी ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयाला भेट दिली व आपल्या या बाइक सफरीतील अनेक अनुभव यावेळी कथन केले.
मला स्वत:ला ‘ए’ राज्याच्या शहरी किंवा ग्रामीण भागात असे काही बिघडले असल्याचे दिसले नाही. या प्रवासात मी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांशी बोलतो. मदतीला सर्व तत्पर असतात. गप्पा मारतात, अनुभव विचारतात, काही मदत हवी आहे का, असे आपुलकीने विचारतात. मग कटुता कुठे आहे, तर ती काही लोकांच्या मनात आहे. ती घालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. या सफरीसाठी कोणीही प्रायोजक मिळवला नसून निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम यात गुंतवल्याचे शर्मा यांनी या भेटीत नमूद केले.

Web Title: Illusion of two-wheeler for health awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.