‘डार्लिंग’मधून अतिमहत्त्वाकांक्षेचे चित्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:08 AM2018-12-20T01:08:45+5:302018-12-20T01:08:58+5:30

अतिमहत्त्वाकांक्षेपोटी व्यावसायिक क्षेत्रात आपले इप्सित साध्य करण्याच्या उद्देशाने वाटेत अडसर ठरू पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कायमचे संपवून टाकण्यापर्यंतच्या थराला काही व्यक्ती पोहचतात किंबहुना तसा डावही आखतात, असेच चित्रण ‘डार्लिंग’च्या प्रयोगातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 Illustration from 'Darling' | ‘डार्लिंग’मधून अतिमहत्त्वाकांक्षेचे चित्रण

‘डार्लिंग’मधून अतिमहत्त्वाकांक्षेचे चित्रण

Next

नाशिक : अतिमहत्त्वाकांक्षेपोटी व्यावसायिक क्षेत्रात आपले इप्सित साध्य करण्याच्या उद्देशाने वाटेत अडसर ठरू पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कायमचे संपवून टाकण्यापर्यंतच्या थराला काही व्यक्ती पोहचतात किंबहुना तसा डावही आखतात, असेच चित्रण ‘डार्लिंग’च्या प्रयोगातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित नाट्यमहोत्सवात सिन्नर केंद्राने ‘डार्लिंग’ हा प्रयोग बुधवारी (दि.१९) सादर केला. परश् ाुराम साईखेडकर नाट्यगृहात विजय साळवी लिखित, विक्रम गवांदे दिग्दर्शित या नाटकाच्या प्रयोगात रागिनी नामक पात्र रंगविणारी युवती वयाने मोठ्या असलेल्या सुबोध नामक एका व्यावसायिकासोबत संपत्ती व ऐश्वर्य मिळविण्याच्या हेतूने लग्न करते. सुबोधच्या व्यवसायावर ताबा मिळविल्यानंतर तिचा लग्नाअगोदरचा प्रियकर पुन्हा रागिनीच्या वैवाहिक आयुष्यात प्रवेश करतो. प्रियकराच्या मदतीने ती सुबोधला संपविण्याचा कट रचते, मात्र त्यांचा हा कट उघडकीस येतो. अतिमहत्त्वाकांक्षेत आंधळी होऊन रागिणीच्या डोक्यातील कट मात्र तसाच कायम राहतो आणि हा कट पूर्णत्वास आणण्यासाठी ती तिसºया व्यक्तीचा शोध घेते.  दरम्यान, सुबोध आणि तिचा प्रियकर रागिणीपासून दूर जातो. रागिणी एकटी पडते. सरतेशेवटी रागिणीची वाताहत होते. संपत्तीही हाती येत नाही आणि वैवाहिक आयुष्यही उद्ध्वस्त होते, असे या नाटकाचे कथानक फिरत जाते. पल्लवी ओढेकर, राजेंद्र लोणारे व श्रीराम गोरे यांच्या या नाटकात भूमिका होत्या.

Web Title:  Illustration from 'Darling'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.