कॉलेज कट्ट्यांच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:25 AM2018-02-26T01:25:09+5:302018-02-26T01:25:09+5:30
महावीर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीत २००३ ते २०१७ या कालावधीतील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील कॉलेज कट्ट्यावरील आठवणींना उजाळा दिला.
नाशिक : महावीर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीत २००३ ते २०१७ या कालावधीतील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील कॉलेज कट्ट्यावरील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयातर्फे शनिवारी (दि. २४) माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत केलेली चर्चा व हास्यकल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिष संघवी यांच्यासह प्राचार्य अजय देशपांडे, डॉ. जयंत पट्टीवार डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. प्रियांका झंवर, चार्टर्ड अकाउंटंट आनंद झंवर आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासोबत आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक विचारांची देवाण-घेवाण झाली. याप्रसंगी मनोज मंडाले, गणेश खुर्दळ, भाग्यश्री जोशी या माजी विद्यार्थिनींनी तसेच प्रा. धनश्री बनकर, प्रा. वृषाली जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. चेतन माळी, सायली चौधरी, सध्या कार्यरत प्रा. वृषाली देसाई व प्रा. धनश्री बनकर यांनी त्यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन प्रा. अनघा सर्वज्ञ यांनी केले.