मी कोरोना....घरी थांबाना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:34 PM2020-04-17T20:34:33+5:302020-04-18T00:26:57+5:30

दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी ग्रामपंचायतीनेही शिवार रस्ते बंद करून कोरोनाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून ‘मी कोरोना...घरी थांबाना’ असे नागरिकांना आवाहन केले आहे.

 I'm Corona .... stopping home ...! | मी कोरोना....घरी थांबाना...!

मी कोरोना....घरी थांबाना...!

Next

दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी ग्रामपंचायतीनेही शिवार रस्ते बंद करून कोरोनाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून ‘मी कोरोना...घरी थांबाना’ असे नागरिकांना आवाहन केले आहे.
सध्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी, मोहाडी, जऊळके-दिंडोरी या गावातील औद्योगिक वसाहतीचा प्रस्थ अधिक असल्याने ही गावे अतिदक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून आल्याबरोबर आपल्या गावाची पूर्ण दक्षता घेऊन गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या मालेगावमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून, त्या अनुषंगाने महामार्ग लगत असलेली जऊळके-दिंडोरी, जानोरी व मोहाडी ही गावे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत.
त्या अनुषंगाने दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक नवले यांनी जानोरी ग्रामस्थांशी चर्चा करून गाव संपूर्णत: बंद करून चहुबाजूने शिवार रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर गावच्या मुख्य रस्त्यावर येणाऱ्या-जाणाºया लोकांची यादी तयार केली जात आहे. त्यामध्ये येणाºयाचे नाव, कोणत्या कामानिमित्त जात आहेत, त्याची माहिती, मोबाइल नंबर, गाडीचा क्र मांक या सर्व गोष्टींचा उल्लेख करून घेतली जात आहे तसेच विनाकारण चकरा मारणाऱ्यांना आवर घातला जात आहे.
----------
जानोरीत प्रतीकात्मक पुतळा
जानोरी ग्रामपंचायतीने सर्व शिवार रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. शिवार रस्ते बंद करून अत्यावश्यक सेवांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर तेथे कोरोनाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा पुतळा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title:  I'm Corona .... stopping home ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक