आयमा निवडणूक : घाईघाईने उमेदवार जाहीर करणे आले अंगलट उमेदवारीबाबत सर्वसहमतीचे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:25 AM2018-05-09T01:25:14+5:302018-05-09T01:25:14+5:30

सिडको : सत्ताधारी एकता पॅनलने सर्वांना विश्वासात न घेता घाईघाईने अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने दुसऱ्या गटाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या गटाने नाराजी व्यक्त केली.

IMA election: Hurry to announce candidates for alliance with the opposition | आयमा निवडणूक : घाईघाईने उमेदवार जाहीर करणे आले अंगलट उमेदवारीबाबत सर्वसहमतीचे प्रयत्न सुरू

आयमा निवडणूक : घाईघाईने उमेदवार जाहीर करणे आले अंगलट उमेदवारीबाबत सर्वसहमतीचे प्रयत्न सुरू

Next
ठळक मुद्देसत्ताधारी गटाने घाईघाईने घेतलेला निर्णय अंगलटउमेदवारी करावयाची याबाबत चर्चा करण्यात आली

सिडको : सत्ताधारी एकता पॅनलने सर्वांना विश्वासात न घेता घाईघाईने अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने दुसऱ्या गटाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या गटाने नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी गटाने घाईघाईने घेतलेला निर्णय अंगलट आल्याचे पाहून मंगळवारी (दि. ७) आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी पुन्हा बैठक बोलावली. सदरची बैठक सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व माजी अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीसाठी इच्छुक असणाºया सर्वांची मते जाणून घेत उमेदवारास कोणत्या पदासाठी उमेदवारी करावयाची याबाबत चर्चा करण्यात आली. अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने सर्वांना विश्वासात न घेता काही माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने अध्यक्षपदासाठी वरुण तलवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे नाराज झालेल्या एकताच्याच दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीत आपल्याला अध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचा आक्षेप घेत रविवारी (दि. ६) आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल, शशिकांत जाधव, मार्गदर्शक सुनील बागुल, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, योगेश कनानी, प्रवीण अहेर, संजीव नारंग, विवेक पाटील, जे. जी. शिर्के, जी. आर. वाघ, एन. टी. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. याआधी अनेक वर्षे झालेल्या निवडणुका ह्या सर्वसंमतीने आणि वरिष्ठांच्या मध्यस्थीने बिनविरोध करण्याची परंपरा पार पाडण्यात आली आहे. यंदादेखील ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी एकताच्याच दुसºया गटाला यात विश्वासात न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी राजेंद्र अहिरे यांनी आज पुन्हा एका हॉटेलमध्ये बैठक घेत दोन्ही गटांकडील इच्छुकांची मते आजमावून घेत कोण कोणत्या पदासाठी इच्छुक आहे याबाबत चर्चा करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी चव्हाण यांची दावेदारी शक्य
गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार तुषार चव्हाण यांना वरिष्ठांनी पुढील निवडणुकीत अध्यक्षपदाचा शब्द दिल्याने व चव्हाण यांनी माघार घेतल्याने राजेंद्र अहिरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. असे असताना पुन्हा होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्यांना डावलत वरुण तलवार यांचे नाव घोषित करण्यात आले. दिलेला शब्द पाळला जात नसल्याबद्दल तुषार चव्हाण यांनी खंत व्यक्त केली असल्याने निवडणुकीत अध्यक्षपदासाठी चव्हाण हे दावेदारी आणि उमेदवारी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: IMA election: Hurry to announce candidates for alliance with the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.