आयएमए नाशिक : डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 08:53 PM2018-03-18T20:53:10+5:302018-03-18T20:53:10+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला.

IMA Nashik: Doctor-patient trust Jopasawa's discussion session | आयएमए नाशिक : डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा चर्चासत्रातील सूर

आयएमए नाशिक : डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा चर्चासत्रातील सूर

Next
ठळक मुद्दे ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावर चर्चासत्रडॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन

नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा सूर चर्चासत्रातून उमटला.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला. यावेळी चर्चासत्रात पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, अ‍ॅड. एम. वाय. काळे, डॉ. एस. के. सिंगल, डॉ. अमोल अन्नदाते, डॉ. मनोज चोपडा, डॉ. बी. एस. वी. प्रसाद, डॉ. कविता गाडेकर, नियोजित अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सहभागी होत डॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन केले.


प्रारंभी सद्यस्थितीत डॉक्टर आणि रुग्णांना भेडसावणा-या समस्या मांडण्यात आल्या व त्यानंतर चर्चेला सुरुवात करण्यात आली. डॉक्टरांनी आपल्याकडे येणा-या रुग्णांशी दिलासादायक संवाद साधल्यास गैरसमजला वाव उरत नाही. रुग्णांच्या प्रश्नांकडे संकुचित विचाराने न बघता व्यापकपणे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केल्यास डॉक्टर-रुग्ण नातेसंबंधातील विश्वासार्हता अधिक वाढते, असे मत गाडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. उपचारानंतर डिस्चार्ज देताना उद्भवणारे वाद आणि उपचार खर्चाविषयी रुग्णाच्या नातेवाइकांकडून घेतली जाणारी शंका, घडणा-या घटना रोखण्यासाठी रुग्णालयांकडून उपचार खर्चाची नियमित माहिती संबंधित नातेवाइकांना समुपदेशनाच्या माध्यमातून करून देणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. समाज घडविणे व बिघडविण्यासाठी कालसापेक्षता महत्त्वाची ठरते. सध्याचा काळ हा टोकदार झालेल्या भावनांचा झाला असून, अशा काळातून समाज वाटचाल करत असताना व्यवसाय जरी असला तरी वैद्यकीय क्षेत्राची नाळ सेवेसोबत जुळलेली आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांविषयी भावना व्यक्त करताना वैद्यकीय क्षेत्राकडून नकारात्मक विचारसरणीची आक्रमकता समाजाला मुळीच अपेक्षित नसते, असे परखड मत यावेळी अग्रवाल यांनी मांडले. याप्रसंगी डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. सतीश पाटील, डॉ. शेखर चिरमाडे, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. राहूल मोदगी यांच्यासह आयएमए सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, सचिव हेमंत सोननीस यांनी केले.

Web Title: IMA Nashik: Doctor-patient trust Jopasawa's discussion session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.