आयएमएचा सूर : ‘अनलॉक’मुळे रुग्ण दुपटीने वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:21 PM2020-06-10T17:21:48+5:302020-06-10T17:26:10+5:30

‘अनलॉक’ केल्यापासून कोरोनाबाधितांच्या रुग्णवाढीचा वेग दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्तीसाठी आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) पदाधिकारी आणि सर्व सदस्यांच्या टीमने टप्प्याटप्प्याने कोरोनाविरोधी रणांगणात उतरण्यास प्रारंभ केला आहे.

IMA tone: Fear of doubling patient due to 'unlock' | आयएमएचा सूर : ‘अनलॉक’मुळे रुग्ण दुपटीने वाढण्याची भीती

आयएमएचा सूर : ‘अनलॉक’मुळे रुग्ण दुपटीने वाढण्याची भीती

Next
ठळक मुद्देउपाययोजनांचा ‘सिक्सर’ ठरेल मॅचविनर !नाशिककरांना एकमेकांमार्फत शपथ देण्याचाही निर्धार

नाशिक : ‘अनलॉक’ केल्यापासून कोरोनाबाधितांच्या रुग्णवाढीचा वेग दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्तीसाठी आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) पदाधिकारी आणि सर्व सदस्यांच्या टीमने टप्प्याटप्प्याने कोरोनाविरोधी रणांगणात उतरण्यास प्रारंभ केला आहे. तसेच आयएमएकडून तंदुरुस्ती राखण्यासाठी आरोग्यदायी उपाययोजनांची ‘षड्सुत्री’ अवलंबण्याचे आवाहन करीत नाशिककरांना एकमेकांमार्फत शपथ देण्याचाही निर्धार करण्यात आल्याचे आयएमएचे सचिव डॉ. सुदर्शन अहिरे आणि उपाध्यक्ष डॉ. प्राजक्ता लेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रत्येक नागरिकाने कोरोनाचा वाढता धोका ओळखून स्वत:ला आणि कुटुंबाला कोरोनापासून वाचवणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी प्रत्येकाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, नियमित मास्क लावणे, गर्दीत जायचे टाळणे, थुंकणे पूर्णत: बंद आणि ६ फूट अंतर राखूनच संवाद साधणे ही षड्सुत्री अंमलात आणण्याबाबत जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे सांगितले. या आरोग्यदायी ६ सवयींनी आपण प्रत्येक जण कोरोनापासून वाचू शकतो, याबाबत नागरिकांना गांभीर्याने आणि सतत सांगण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने या सहा सूत्रांचा अवलंब करतानाच या नियमांचा आपापल्या परिसरात अधिकाधिक प्रसार करण्याचे आवाहनदेखील डॉ. लेले आणि डॉ. अहिरे यांनी केले.
दररोज चार डॉक्टरांची सेवा
गत दोन-अडीच महिन्यांच्या सततच्या तणावपूर्वक वातावरणातून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना काहीसा दिलासा मिळावा या हेतूने आयएमएचे चार डॉक्टर्स दररोज त्यांची सेवा जिल्हा रुग्णालयात बजावणार आहेत. बुधवारी आयएमएचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांच्यासह अन्य तिघांनी सेवा दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
 

Web Title: IMA tone: Fear of doubling patient due to 'unlock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.