गोदा प्रदूषण करणाऱ्यांवर करणार तत्काळ कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:28 AM2019-04-27T00:28:02+5:302019-04-27T00:28:20+5:30
मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्र वारी (दि.२६) सकाळी गंगाघाट रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण रोखण्यासाठी मनपा स्तरावर कोणत्या व काय उपाययोजना करता येतील यासाठी पाहणी दौरा केला.
पंचवटी : मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्र वारी (दि.२६) सकाळी गंगाघाट रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण रोखण्यासाठी मनपा स्तरावर कोणत्या व काय उपाययोजना करता येतील यासाठी पाहणी दौरा केला. तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
या पाहणी दौºयात पुजारी आणि देवदर्शनासाठी येणाºया भाविकांकडून गोदेचे प्रदूषण केले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धार्मिक विधी करणाºया पुजारी वर्गाने सुधारणा करावी. देवदर्शनासाठी येणाºया भाविकांना गोदाप्रदूषण करण्यापासून रोखावे नाहीतर अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आयुक्त गमे यांनी सकाळी अधिकाºयांसमवेत रामकुंड परिसरात पाहणी केली असता त्यात गोदा पात्रातील पाणी दूषित असल्याचे दिसले. भाविकांसाठी उभारलेल्या पाणपोईभोवती अनेक भिकाºयांचा गराडा असून, अडथळा निर्माण होत असल्याने समस्या तत्काळ दूर करण्याबाबत सूचना दिल्या. बेशिस्त व्यावसायिक व सांडपाणी सोडणाºयांना नोटिसा बजाविण्याची कारवाई करण्याबाबत संबंधित विभाग अधिकाºयांना सूचना दिल्या.
सहकार्याचे आवाहन
गंगाघाटावर पूजा विधी करणारे काही पुजारी, भाविक मनपाने तयार केलेल्या अस्थी कुंडात अस्थी न टाकता रामकुंडातच टाकत असल्याचे आढळून आले. सतीश शुक्ल यांना गोदेचे प्रदूषण रोखणे सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून सहकार्य करावे अन्यथा पुजाºयांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले.