सरकार स्थापनेनंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 05:55 PM2019-11-07T17:55:18+5:302019-11-07T17:55:27+5:30
छगन भुजबळ : नुकसानग्रस्त भागाची पाहणी
देशमाने : येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन सरकार स्थापनेनंतर तातडीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार छगन भुजबळ यांनी दिले. देशमाने येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतमालाची प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी रब्बी हंगामात लागण्यारी खते-बियाणे देखील शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता उपस्थित शेतक-यांनी गत वेळचा दुष्काळिनधी अद्याप मिळाला नसल्याची तक्र ार केली. यावेळी प्रस्ताव सादर केले असून सदर निधी उपलब्ध होताच वितरित करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले. आण्णा जगताप या तरु ण शेतक-याने पीक उभे करण्यापासून ते आजच्या परिस्थितीत सर्वच शेतमालाची झालेल्या राखरांगोळी बाबत घटनाक्र म सांगताच उपस्थितांचे देखील डोळे देखील पाणावले होते. गत दुष्काळिनधी अद्यापही न मिळाल्याने चालू नुकसान भरपाई तरी तातडीने द्यावी असी मागणी शेतक-यांनी केली. पाहणी दौ-याप्रसंगी राधाकिसन सोनवणे, महेंद्रशेठ काले, प्रकाश वाघ, मोहन शेलार, गणेश दीघड, रतन काळे, भीमराज दुघड, मोहन राठोड, प्रभाकर जाधव,तहसीलदार रोहिदास वारु ळे, तलाठी दत्तात्रेय टिळे, ग्रामविस्तार अधिकारी अंबादास साळुंखे आदीसह शेतकरी उपस्थित होते.