नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करा : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:01 PM2019-11-01T16:01:45+5:302019-11-01T16:01:56+5:30
लोहोणेर : - पावसामुळे द्राक्ष, कांदे, मकई बाजरी या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ ...
लोहोणेर : - पावसामुळे द्राक्ष, कांदे, मकई बाजरी या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे प्रशासकीय यंत्रणेला दिले. खोत यांनी शुक्रवारी ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब रकीबे व दिनेश रकीबे यांच्या नुकसान झालेल्या ३० एकर द्राक्षेबागेची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा करत त्यावर प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी दिनेश रकिबे यांनी अर्ली द्राक्षाच्या पिकविमा कालावधी बाबत अडचण मांडली. झालेल्या सर्वच पिकांची नुकसान भरपाई शासनाकडुन व पिकविमा कंपनीकडुन लवकरात लवकर मिळावी अशी मागणीही उपस्थित शेतकऱ्यांनी खोत यांचेकडे केली. यावेळी निवृत्ती रकीबे, सतिश देशमुख , दिलीप अिहरे , किरण मोरे, मोती चौधरी, सरंपच मधुकर व्यवहारे, वसंत शिंदे, गणेश देवरे, दादाजी मोरे, बाळु अहिरे, नितीन आहेर , सुरेश पाटील, दिलीप पाटील, प्रदीप शेवाळे, हिरामण आहेर, यांच्यासह प्रांत अधिकारी विजय भांगरे, बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे ,कृषीअधिकारी एस.एस.पवार, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, पर्यवेक्षक चव्हाण ,तलाठी योगेश मेश्राम ,कृषी सहाय्यक पुष्पा गायकवाड,ग्रामविकास अधिकारी वाघ यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
------------------------
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, मकई, बाजरी आदी पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे लवकरात लवकर सर्व प्रशासनाने पुर्ण करून मदतीचा हात देणार !
-सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री
-----------------------------
शासनाकडुन व पिकविमा कंपनीकडून त्वरित सर्वच नुकसानग्रस्त पिकांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी.
-बाळासाहेब रकिबे , द्राक्ष उत्पादक शेतकरी, ठेंगोडा