नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:43 PM2020-06-04T21:43:56+5:302020-06-05T00:34:59+5:30

येवला : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून लवकरच मदत दिली जाईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी तालुक्यातील अंदरसूल, धामणगाव येथे वादळाने झालेल्या नुकसानीची गुरुवारी (दि. ४) पाहणी केली.

 Immediate help to the victims | नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत

Next

येवला : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून लवकरच मदत दिली जाईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी तालुक्यातील अंदरसूल, धामणगाव येथे वादळाने झालेल्या नुकसानीची गुरुवारी (दि. ४) पाहणी केली.
येवला तहसील कार्यालय येथे निसर्ग चक्रीवादळ नुकसान, खरीप आढावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी निसर्ग
चक्र ीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून
शासनास अहवाल देण्याचे आदेश दिले. तसेच येवला शहर व तालुक्यात असलेल्या कोरोना रुग्णांचा आढावा घेतला.
येवला तालुक्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेऊन त्याची सद्यस्थिती शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीककर्ज वाटप, बियाणांची उपलब्धता व पुरवठ्याबाबत नियोजन, खतांची उपलब्धता व पुरवठा याबाबत नियोजन, सिंचनासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन याचा आढावा घेऊन येवल्यातील पाणीटंचाईबाबत केल्या जाणाºया उपाययोजनांचा आढावा, ३८ गाव व ४१ गाव पाणीपुरवठा योजनांची माहिती घेत वीजपुरवठा व ट्रान्स्फॉर्मरबाबत अडचणी भुजबळ यांनी जाणून
घेऊन संबंधित अधिकाºयांना सूचना दिल्या.
बैठकीस प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारूळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी एम.पी. प्रजापती, उपविभागीय अभियंता एस. एम. देवरे, उपअभियंता स.प्र. राजपूत, तालुका कृषी अधिकारी के.ए. नवले, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी आदी अधिकारी उपस्थित होते.
---------------------
कामांची पाहणी
येवला शहरातील संजीवनी मजूर सहकारी संस्था संचलित शिवभोजन केंद्रास पालकमंत्री भुजबळ यांनी अचानक भेट दिली. तसेच येवला प्रशासकीय संकुलात पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणीही केली. दरम्यान, तालुक्यातील नगरसूल येथे पावसाने मोठे नुकसान झाले. आश्रमशाळेचे पत्रे उडाले असून, सोलर यंत्राचे नुकसान झाले. लवकरच शाळा सुरू होणार असून, शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

 

Web Title:  Immediate help to the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक