४५ वर्षांवरील नागरिकांसाठी तूर्तास लसीकरण तूर्तास बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:29+5:302021-05-08T04:15:29+5:30
नाशिक- शासनाच्या निर्देशानुसार सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लसीकरण करण्यात येत आहे. तेही टाईम स्लॉट बुक केल्यानंतरच दिली ...
नाशिक- शासनाच्या निर्देशानुसार सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लसीकरण करण्यात येत आहे. तेही टाईम स्लॉट बुक केल्यानंतरच दिली जात आहे. तूर्तास ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबत सूचना आणि डोस नसल्याने नागरिकांनी अकारण लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे स्पष्टीकरण आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे. सध्या ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना काेरोना प्रतिबंधक लस घ्यायची आहे, त्यांची केंद्रांवर गर्दी होत आहे. विशेषत: दुसरा डोस घेणाऱ्यांची गर्दी होत असून त्यांना नकार दिल्याने गोंधळ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी ४५ वर्षांपेक्षा अधिक असलेल्या ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला त्यांना एक महिन्यानंतर दुसरा डोस देणे आवश्यक हेाते. मात्र नंतर सुधारित शासनाच्या निर्देशानुसार दुसरा डोस हा सहा ते आठ आठवड्यानंतर द्यावा, अशा सूचना आहेत.
सध्या शासनाकडून मिळणारा लसींचा साठा हा सध्या कमी प्रमाणात आहेत, त्यातच त्यातच १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ही लस फक्त वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटासाठी वापरणेबाबत सूचना आहेत. १८ वर्षे ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांना लस घेण्याकरिता प्रथम लसीकरणाच्या वेबसाईटवर स्वतःची नाव नोंदणी करावी लागते व त्यानुसार मिळालेल्या टाईम स्लॉटनुसार लस केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागते या नोंदणी दरम्यान टाईम स्लॉटमध्ये जेवढे व्यक्ती अपेक्षित आहेत, तेवढ्याच प्रमाणामध्ये राज्य शासनाकडून प्राप्त होत असल्याकारणाने सदरची लस ही दुसऱ्या डोसकरिता ४५ वर्षांपेक्षा जास्त नागरिकांना वापरता येत नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
कोट...
महानगरपालिकेला पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नागरिकांकरिता कोविडची कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ माहिती दिली जाईल. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका