"नाशिक जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना तत्काळ नोकरीचे नियुक्ती आदेश द्या"

By अझहर शेख | Published: May 8, 2023 07:32 PM2023-05-08T19:32:21+5:302023-05-08T19:34:07+5:30

अनुकंपा पदभरती प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत भुसे यांनी आढावा घेतला.

"Immediate Job Appointment Orders to Compassionate Persons in Nashik District" | "नाशिक जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना तत्काळ नोकरीचे नियुक्ती आदेश द्या"

"नाशिक जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना तत्काळ नोकरीचे नियुक्ती आदेश द्या"

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यात ‘झीरो पेंडेंसी’बाबत सूचना मागील बैठकीत देण्यात आल्या होत्या. यानुसार, जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय अस्थापनांमधील प्रलंबित अनुकंपाधारक पात्र उमेदवारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ३२९ पात्र उमेदवारांना नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

अनुकंपा पदभरती प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि. ८) दुपारी झालेल्या बैठकीत भुसे यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह जिल्हा पातळीवरील सर्व विभागांचे नियुक्ती अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हास्तरावरील नियुक्ती अधिकाऱ्यांनी अनुकंपा पदभरतीमधील शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. अनुकंपा भरती प्रक्रियेत कृषी विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयातील ज्या तांत्रिक पदांची शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे अनुकंपा उमेदवार उपलब्ध होत नाहीत, अशा विभागांनी संबधित अनुकंपा उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याबाबत कळवावे व त्यांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे, असेही भुसे म्हणाले.

तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद व महामंडळे यांच्या आस्थापनेवरील अनुकंपा पदभरतीबाबत संबंधित विभागांनी तत्काळ स्वतंत्र बैठक घेण्यात घेत, नियमांनुसार आवश्यक ते नियोजन करावे, असेही भुसे म्हणाले. जिल्ह्यातील ज्या विभागांची अनुकंपा भरती प्रक्रिया सुरू आहे, त्या विभागांनी येत्या चार दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश भुसे यांनी दिले.

Web Title: "Immediate Job Appointment Orders to Compassionate Persons in Nashik District"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक