बागलाणमधील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:54+5:302020-12-16T04:30:54+5:30

बागलाण तालुक्यात दि. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुमारे ८०० ...

Immediate panchnama of affected crops in Baglan | बागलाणमधील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा

बागलाणमधील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा

Next

बागलाण तालुक्यात दि. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुमारे ८०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पीक पूर्णपणे बाधित होऊन वाया गेले आहे. यामुळे अर्ली द्राक्ष पीक घेणाऱ्या उत्पादकांचा यंदाचा हंगामच वाया जाऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्यावर्षीदेखील अशाच प्रकारे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून नेला. तीच परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. महागडे बियाणे खरेदी करून कांद्याची रोपे तयार केली. एकरी हजारो रुपये खर्च करून लागवड केली, मात्र या अवकाळी पावसाने काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाचे स्वप्न धुळीस मिळाले. अवकाळीने सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक करपा रोगाने बाधित झाले आहे. तसेच बहुतांश शेवगा पीक, रब्बी हंगामातील हरभरा, गहू ही पिकेदेखील बाधित झाली आहेत. या अस्मानी संकटामुळे बळीराजाचे पूर्णपणे कंबरडे मोडले असून, बाधित पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, या मागणीसाठी आमदार दिलीप बोरसे यांनी मंगळवारी (दि. १५) कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन साकडे घातले. याची दखल घेत भुसे यांनी बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर भरपाईसाठी तो शासनाकडे सादर करण्यात येईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

===Photopath===

151220\15nsk_19_15122020_13.jpg

===Caption===

बागलाण तालुक्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, शेवगा तसेच रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी या मागणीचे पत्र कृषी मंत्री दादा भुसे यांना सादर करतांना आमदार दिलीप बोरसे.१५ सटाणा १

Web Title: Immediate panchnama of affected crops in Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.