लक्षणे भासल्यास तात्काळ चाचणी हाच बचावाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:30+5:302021-04-26T04:13:30+5:30
नाशिक : कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असल्याने सध्याच्या स्थितीत ज्या कुणा नागरिकाला सर्दी, ताप, खोकला, अशी कोणतीही ...
नाशिक : कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असल्याने सध्याच्या स्थितीत ज्या कुणा नागरिकाला सर्दी, ताप, खोकला, अशी कोणतीही लक्षणे दिसली तरी घरगुती औषधे किंवा मनानेच गोळ्या न घेता तात्काळ कोरोनाची चाचणी करून घेणे हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त बाहेर जाणाऱ्याव्यतिरिक्त घरातील अन्य कुणीही घराबाहेर पडता कामा नये, तसेच तुमच्या कुटुंबात किंवा घरानजीक जर कुणी बाधित असेल, तर शासन नियमानुसार १४ दिवस स्वत:हून क्वारंटाइन होणे आवश्यक आहे. त्यातूनही कुणाला थोडी जरी लक्षणे वाटली, तर त्वरित चाचणी आणि ताबडतोब उपचारांना सुरुवात करणे आवश्यक आहे. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबीसारखी क जीवनसत्त्व असणाऱ्या फळांनीदेखील चांगला लाभ होतो, तसेच घरातील पौष्टिक आणि साधे, गरम जेवणच घेण्यावर प्रत्येकाने भर देणे आवश्यक आहे. या सर्व प्राथमिक बाबींची काळजी घेण्यासह शासनाने घालून दिलेले मास्क, हात सतत धुणे आणि दोन व्यक्तींनी शक्य तेवढे अंतर राखूनच बोलल्यास कोरोना होण्याची शक्यता नाहीशी होते.
इन्फो
कफजन्य पदार्थ टाळावेत
कोरोना होऊ नये यासाठी सर्वप्रथम प्राथमिक नियमांचे पालन आवश्यक आहे, तसेच बाहेरून पदार्थ मागवणे किंवा घरी सतत मसालेदार पदार्थ बनवून खाणे एकदम अयोग्य आहे. त्याशिवाय ज्यामुळे सर्दी किंवा कफ निर्माण होईल, असे थंड, कफजन्य पदार्थदेखील टाळण्यावर भर द्यायला हवा. कोणत्याही परिस्थितीत ताप, सर्दी, न्यूमोनिआ होणार नाही, याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे.
फोटो
२५त्र्यंबके