सारडा विद्यालयात गणेशमूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:04 PM2020-08-28T23:04:01+5:302020-08-29T00:09:40+5:30
सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा वर्षांपासून विद्यालयात शाडूमातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा होत असते. विद्यार्थिदशेतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती व्हावी या हेतूने ही कार्यशाळा संपन्न होत असते. विद्यार्थीही मोठ्या उत्साहात सहभागी होत आकर्षक गणेशमूर्ती साकारत असतात व त्याच मूर्तीची आपल्या घरी प्रतिष्ठापना करत असतात.

यावर्षी शाळा बंद असल्याने कार्यशाळा घेता आली नाही म्हणून कलाशिक्षक राहुल मुळे यांनी शाडूमातीची मूर्ती बनविण्याचा व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून क्रमाक्रमाने गणेशमूर्ती तयार करून घेतली. विद्यार्थ्यांनी स्व-कल्पनांचा उपयोग करून आपल्या परिवारासह पर्यावरणपूरक शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारल्या होत्या. विद्यालयातही शाडूमातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विद्यालयातील गणेशमूर्तीचे, बापूसाहेब पंडित व सौ. रेखा पंडित यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करून पर्यावरणपूरकरीत्या विसर्जन करण्यात आले. निर्माल्याचा उपयोग विद्यालयातील झाडांना खत म्हणून करण्यात आला. यावेळी प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षक सुनील हांडे, राहुल मुळे, अण्णा जाधव, रोहिणी परदेशी, छाया मढे, स्मिता पाटोळे, कविता गायकवाड, वसंत पैठणकर, ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक जाधव, कांतिलाल राठोड, गणपत बेजेकर, महेंद्र गुरव, खेमराज जोशी, टीका जोशी आदी उपस्थित होते.