रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘इम्युनिटी बंडल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:38+5:302021-06-19T04:10:38+5:30
कोविडनंतर अनेक रुग्णांमध्ये, थकवा, झोप न लागणे, आप्तांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली मानसिक अस्वस्थता, छातीत धडधडणे, थरथरणे, घाम येणे आदी ...
कोविडनंतर अनेक रुग्णांमध्ये, थकवा, झोप न लागणे, आप्तांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली मानसिक अस्वस्थता, छातीत धडधडणे, थरथरणे, घाम येणे आदी समस्या अनेक रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे आपण पूर्णपणे बरे झालो असे नाही. निरीक्षणानुसार कोविडनंतर अनेक रुग्णांमध्ये अशक्तपणा, कोरडा खोकला, अंगदुखी, भूक न लागणे व बद्धकोष्ठता अशी लक्षणे आढळून येत आहेत. तर काही रुग्णांमध्ये झोपेचा त्रास, छातीत जळजळ अशी लक्षणे आढळून येत आहेत. डॉ. रोहित पराते (भोपाळ) आणि डॉ. नेहा शहा (अमेरिका) यांनी इम्युनिटी बंडलचा रुग्णांकडून झालेल्या वापराबाबत आपला शोधप्रबंध सादर केला असून तो मेडिकल जर्नल ऑफ क्लिनिकल ट्रायल अँड केस स्टडीजमध्ये प्रकाशित झाला आहे. सदर संशोधनानुसार त्यांनी रुग्णांना एन्झाईम आणि प्रोबायोटिक्स हे सप्लिमेंट देऊन चाचण्या केल्या. या चाचण्या अतिशय लाभदायी ठरल्याचे त्यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे.
इन्फो
औषध नव्हे, औषधांसाठी पूरक
संशोधनानुसार रुग्णांच्या शरीरातील थकवा पंधरा दिवसांच्या आत कमी होऊन त्यांच्या त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे. हे सप्लिमेंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून ते औषध नाही परंतु औषधांसाठी पूरक आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ते मदत करते असे शोधप्रबंधात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकन मेडिकल जर्नलच्या मान्यतेनंतर इम्युनिटी बंडल या फाॅर्म्युल्याचे उत्पादन सिन्नरजवळील माळेगाव एमआयडीसीत होत आहे.
कोट....
‘कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटात भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती अबाधित ठेवण्याची गरज म्हणून इम्युनिटी बंडल फाॅर्म्युला देशात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठीचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांना तूर्तास हा फॉर्म्युला ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
डॉ. अभिजित राठी, संचालक, अॅडव्हान्स एन्झाईम लिमिटेड