विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:28 IST2019-04-24T16:28:20+5:302019-04-24T16:28:27+5:30
मालेगाव : तालुक्यातील चौकटपाडे येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपातून पती सोमनाथ जगताप, सासरा नामदेव जगताप, सासू जिजाबाई जगताप यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
मालेगाव : तालुक्यातील चौकटपाडे येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपातून पती सोमनाथ जगताप, सासरा नामदेव जगताप, सासू जिजाबाई जगताप यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. बायजाबाई सोमनाथ जगताप या विवाहितेचा २००५ ते आॅगस्ट २०१० पर्यंत घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणले नाही म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमवर्ग न्यायाधीश जे. जे. इनामदार यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीकडे लग्नाआधीच घर व शेती असल्याचे फिर्यादीने उलट तपासणीत कबूल केले व जबाणीत विसंगती आढळली. अॅड. निमिष मर्चंट यांनी आरोपीतर्फे काम पाहिले.