निर्यातबंदीचे पडसाद, कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:38 PM2020-09-15T14:38:59+5:302020-09-15T14:39:10+5:30
लासलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा निर्यातबंदी चे पडसाद उमटताच दरात किवंटलमागे हजार रूपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लासलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा निर्यातबंदी चे पडसाद उमटताच दरात किवंटलमागे हजार रूपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी माजी पं स सभापती शिवा सुरासे यांच्या यांच्या सह शेतकरी बांधवांनी अर्धा तास रास्ता रोको केला. त्यानंतर कांदा लिलावाला सुरुवात होताच कांद्याच्या सरासरी दरांमध्ये एक हजार रुपयाची घसरण झाल्याने संतप्त शेतकºयांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत लिलाव बंद पाडले. सकाळी सहा वाहनांचा लिलाव झाला. यात कांद्याला सर्वोच्च २२०० रुपये प्रति क्विंटल तर सरासरी १९०० रुपये भाव जाहीर झाला. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती या शेतकºयांसाठी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जातात मात्र शेतकरी प्रतिनिधी करत असलेले एकही संचालकाने या आंदोलनात न आल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा वगळण्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हायच्या आतच वाढणाºया कांद्याच्या दराला आळा बसविण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक १४ रोजी निर्यात बंदीची घोषणा केली आणि त्याचे पडसाद येथील बाजार समितीत कांदा भावावर पडले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ७५० वाहनांची आवक बंद झालेली होती,मात्र फक्त सहा वाहनांचा लिलाव झाला मात्र कालच्या तुलनेमध्ये कांदा दरामध्ये एक हजार रुपयांची घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी लिलाव बंद पाडले.