थंडी वाढल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:01 PM2019-01-02T17:01:32+5:302019-01-02T17:02:44+5:30
पिंपळगाव बसवंत : परीसरात गेल्या आठवड्यात १.८ तापमान झाले होते. आजही ३.० तापमान झाले असुन या थंडीत जनावरांच्याहीआरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
पिंपळगाव बसवंत : परीसरात गेल्या आठवड्यात १.८ तापमान झाले होते. आजही ३.० तापमान झाले असुन या थंडीत जनावरांच्याहीआरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
येथील प्रमोद मोरे यांची दुध देणारी लक्ष्मी नावाची गाय हि या थंडीच्या कडाक्यात पायांवर परीणाम होऊन गेल्या पाच दिवसापासुन ती स्वत:च्या पायावर ऊभी राहु शकत नसल्याने मोरे कुटुंबच हतभल झाले आहे. रोज हे कुटुंब मोहरीच्या तेलाने या गायीच्या पायाची मॉलीश करत आहे.
या बाबतीत उज्वल गो शाळेचे डॉ. आनंद खैरनार यांनी या वर्षी कधी नव्हे एवढी थंडीची तिव्रता भयानक असुन याचा परिणाम जनावरांवरही होत असुन जनावरांचे कॅल्शियम व फॉस्परसची मात्रा कमी होत आहे. यासाठी जनावरांचै गोठे बंद करणे. तसेच गोठ्यात शेकोट्या पेटवणे, ज्वारी, मका आदी पोषण आहारात वाढविणे व सकाळचे कोवळे ऊन जनावरांना दाखविणे. या प्रमाणे जनावरांसाठी विशेष काळजी घ्यावी लागत असून मल्टिव्हिटॅमिन, मिनरल देणे गरजेचे आहे. अजुन दहा ते पंधरा दिवस तरी जनावरांची अशी काळजी घ्यावी लागणार असल्याचे डॉ. खैरनार यांनी सांगितले.
(फोटो ०२ पिंपळगाव)