नाशिक-पेठ महामार्गावर चिखलाचे साम्राज्यपावसाचा परिणाम : वाहनधारकांचे हाल; दुपदरीचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 10:16 PM2017-12-06T22:16:00+5:302017-12-06T22:19:32+5:30

The impact of the Mud empire on the Nashik-Peth Highway: The holders of the vehicle; Duplicate work slow | नाशिक-पेठ महामार्गावर चिखलाचे साम्राज्यपावसाचा परिणाम : वाहनधारकांचे हाल; दुपदरीचे काम संथगतीने

नाशिक-पेठ महामार्गावर चिखलाचे साम्राज्यपावसाचा परिणाम : वाहनधारकांचे हाल; दुपदरीचे काम संथगतीने

Next
ठळक मुद्देनाशिक-पेठ महामार्गावर चिखलाचे साम्राज्यपावसाचा परिणाम : वाहनधारकांचे हाल; दुपदरीचे काम संथगतीने

पेठ : मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून, प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतुकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नाशिक ते पेठपर्यंत गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, पूर्वीचा रस्ता खोदून काढल्याने पावसामुळे रस्त्यावर गाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यात अवजड वाहनांच्या वर्दळीने रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. अनेक वाहने गाळात अडकून पडली आहेत तर प्रवासी वाहतूकदारांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ठेकेदारांनी केवळ मलमपट्टी म्हणून टाकलेले मातीचे भराव खचून गेल्याने वाहने चिखलात रुतून बसली आहेत. एकीकडे वाहनधारकांसह प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत असताना संबंधित कामावरील ठेकेदार मात्र याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक करत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता सर्रासपणे रस्ता उखडण्याचे काम सुरू आहे.

Web Title: The impact of the Mud empire on the Nashik-Peth Highway: The holders of the vehicle; Duplicate work slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक