‘निसर्ग’ वादळाचा शहरासह जिल्ह्यात प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 06:38 PM2020-06-03T18:38:52+5:302020-06-03T18:41:19+5:30
नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात संध्याकाळनंतर ...
नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात संध्याकाळनंतर धडकणार आहे. सध्या नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात चक्रीवादळाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. शहरात वादळाचा फारसा परिणाम जाणवत नसला तरीदेखील पावसाच्या सरी दिवसभर कोसळत असून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १७ मि.मी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात वाऱ्याचा वेग दूपारच्या तुलनेत आता वाढलेला दिसून येत असून ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहे.
शहरात आज दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरींचा वर्षाव सुरूच आहे. पहाटेपासून दूपारपर्यंत वारे ताशी १५ ते २० किमी वेगाने वाहत होते. हळुहळु संध्याकाळपर्यंत वा-याच्या वेगात वाढ होत गेली.दिवसभरात पावसाने शहरात चांगलीच हजेरी लावली. वा-याचा वेग कमी-अधिक होत होता. अग्निशमन दलाच्या जवानांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाचे मुख्यालय तसेच सर्व उपकेंद्रांवर जवान आवश्यक त्या साधनसामुग्रीने सज्ज आहेत. दिवसभरात किरकोळ अपघाताच्या घटना शहरात घडल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, नाशिक कडे संध्याकाळी वादळाने आपली दिशा केल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या इशारा देण्यात आला.
काठे गल्लीतील गणेशनगर उद्यानासमोरील मोठा बॉटल पाम वृक्ष कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी काठेगल्लीत पोहचून वृक्षाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. वाºयाचा वेग संध्याकाळनंतर वाढल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडण्यास शहरात सुरूवात झाली आहे. शहरात परदेशी प्रजातीची ठिसूळ वृक्षांची संख्या मोठी असल्याने वादळाचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर सोसाट्याचा वारा शहरात वाहू शकतो आणि या वादळी वाºयाने अशी ठिसूळ झाडे मोठ्या संख्येने उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आज दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू होता. काही भागांमध्ये वीजतारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला तर कोठे झाडांच्या फांद्या तुटून विजवाहिन्यांवर आल्याने वीजपुरवठा बाधित झाला. काही उपनगरांमध्ये दोन ते तीन तास तर काही भागांमध्ये तासभर वीज गायब राहिली. महावितरण कंपनीच्या वायरमन कर्मचाऱ्यांनी भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावून चोख कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला.