उत्पादनातील घटीमुळे टमाटा आवकेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:40 PM2019-10-12T20:40:02+5:302019-10-12T20:41:28+5:30
वणी : अतिवृष्टीमुळे टमाटा पिकाच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम आवकेवर झाला असुन अवघे १९५० किलो टमाटा विक्र ीसाठी उत्पादकांनी आणल्याने व्यवहार प्रणालीची गती कमी होऊन आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वणी : अतिवृष्टीमुळे टमाटा पिकाच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम आवकेवर झाला असुन अवघे १९५० किलो टमाटा विक्र ीसाठी उत्पादकांनी आणल्याने व्यवहार प्रणालीची गती कमी होऊन आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
वणी सापुतारा रस्त्यावर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजारात टमाटा खरेदी विक्र ीचे व्यवहार सुरु आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांबरोबर परिसरातील तसेच परराज्यातील व्यापारी टमाटा खरेदीसाठी येतात. परराज्यातही प्रतीदीन अनेक ट्रक टमाटा विक्र ीसाठी अडत्यांच्या माध्यमातून जातात. हे गतवर्षीचे चित्र तसेच परिसरातील टमाटा उत्पादकांना व्यवहार करणे सोयीचे व्हावे यासाठी खोरीफाटा येथेही खरेदी विक्र ी केंन्द्र सुरु करण्यात येते. तेथे मोठी आर्थिक उलाढाल होते व पर्यायी व्यवसायालाही सुगीचे दिवस येतात. त्यात हॉटेल्स, पेट्रोल पंप, प्लास्टिक क्र ेट, पेपर रद्दी भाड्याने वाहतुक करणारा वर्ग मजुरवर्ग या व अशा सर्व तत्सम घटकांना अनुकुलस्थिती निर्माण होते, व यात्रेचे स्वरु प या दोन्ही केन्द्राला येते हा प्रतीवर्षीचा अनुभव मात्र या वर्षी अतिवृष्टी व परतीच्या बेमोसमी पावसामुळे सुमारे ५० टक्के टमाटा भुईसपाट झाल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील उत्पादक हवालदिल व हतबल झाले आहेत. याचा एकत्रित परिणाम टमाटा आवकेवर झाला आहे.
हजारो क्विंटल आवक ज्या ठिकाणी होत होती, तेथे हा आकडा मात्र दोन हजार क्विंटलवर आल्याने खरेदीदार अधिक व टमाटा मर्यादीत अशी स्थिती झाल्याने परप्रांतीय व्यापारीही अद्याप खरेदी केन्द्राच्या बदलत्या स्थितीचा अभ्यास करत सकारात्मक वातावरणाच्या प्रतिक्षेत आहेत.