कारभारी परिचय धोरण राबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:53 AM2019-03-01T00:53:45+5:302019-03-01T00:54:21+5:30

नाशिक : सरपंचांना अनेक अडचणी असतात; परंतु त्यांनी त्यावर मात करून पुढे जायचे असते. त्यांना संघटनात्मक काम उभे करायचे आहे. सरपंचांचे प्रश्न मांडणारी ताकदवान अशी संघटना नाही. त्यामुळे सरपंचांनी गावच्या गरजा ओळखून काम केले पाहिजे. सरपंचांसाठी कारभारी परिचय धोरण राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांनी बोलताना केले.

Implement introductory introduction policy | कारभारी परिचय धोरण राबवावे

कारभारी परिचय धोरण राबवावे

Next
ठळक मुद्देअर्चना जतकर : सरपंचांच्या जबाबदाऱ्यांवर केले विवेचन

नाशिक : सरपंचांना अनेक अडचणी असतात; परंतु त्यांनी त्यावर मात करून पुढे जायचे असते. त्यांना संघटनात्मक काम उभे करायचे आहे. सरपंचांचे प्रश्न मांडणारी ताकदवान अशी संघटना नाही. त्यामुळे सरपंचांनी गावच्या गरजा ओळखून काम केले पाहिजे. सरपंचांसाठी कारभारी परिचय धोरण राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांनी बोलताना केले.
सरपंचांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे हक्क याबाबत विवेचन करताना जतकर म्हणाल्या, अनेक सरपंचांना त्यांच्या कारभाराची माहिती नसते. अंदाजपत्रक कसे बनवावे, हे माहिती नसते. त्यासाठी सरपंचांनी सजग राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.सरपंचांना हवे प्रशिक्षणसरपंचांना निवडून आल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र मिळाले पाहिजे. त्यांचा शपथविधी झाला पाहिजे. सरपंच झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे; परंतु आपण केवळ अनुभवावरच शिकत पुढे जात असतो. आजही अनेक गावात ग्रामसेवकराज आहे. अनेक महिला सरपंचांनी चांगले काम करून दाखविले आहे. शिक्षण नसतानाही त्यांनी गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरपंच प्रतिनिधी म्हणून एकही आमदार नाही. दुखणे आपले असते; परंतु मांडणारे दुसरेच असतात. सरपंचांना तुटपुंजे मानधन मिळते. त्यांना मीटिंग भत्ता वेळेवर मिळत नाही. त्यांना आपल्या प्रश्नांसाठीच झगडावे लागते, असे सांगत जतकर यांनी सरपंचांना व्यासपीठ मिळवून देणाºया लोकमतचे कौतुक केले.

Web Title: Implement introductory introduction policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच