कळवण उपजिल्हा रुग्णालयात रक्त तपासणी यंत्रणा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:51 PM2019-03-09T17:51:37+5:302019-03-09T17:51:51+5:30
जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतली दखल
कळवण : कळवण उपजिल्हा रु ग्णालय आणि शासन नियंत्रित महालॅब यांच्यात समन्वय नसल्याने जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याऐवजी महिलेची हेळसांड झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली असून उपजिल्हा रु ग्णालय आणि महालॅब यांच्याकडे विचारणा केली आहे. दाम्यान, उपजिल्हा रु ग्णालयातील सीबीसी यंत्रसामुग्री संबंधित कंपनीकडून तात्काळ दुरु स्त करण्यात येऊन कार्यान्वित झाल्याने सीबीसीसह रक्ताच्या सर्व तपासण्या उपजिल्हा रु ग्णालयात केल्या जाणार आहेत.
कळवण उपजिल्हा रु ग्णालयात सर्व रक्त तपासण्या केल्या जातात. मात्र काही महिन्यांपासून यंत्रणा नादुरु स्त व तपासणीसाठी लागणाऱ्या रसायनांचा नियमित पुरवठा होत नसल्याने वरीष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात येऊन देखील दखल घेतली जात नव्हती. शनिवारी (दि.९) लोकमतमध्ये याबाबतचे वृत्त झळकताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सीबीसी यंत्रसामुग्रीच्या दुरु स्तीसह त्यासाठी आवश्यक रसायन उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य रु ग्णांची हेळसांड आता थांबणार आहे.
शासनाने सर्वसामान्य रु ग्णांसाठी वेगवेगळ्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहचवल्या खऱ्या मात्र स्थानिक पातळीवर या सुविधांच्या ढिसाळ कारभारामुळे रु ग्णांची हेळसांड होत असल्याचे जागतिक महिला दिनी एका वयोवृद्ध महिलेला व तालुक्यातील काही रु ग्णांना अनुभवास आल्याने शासनाच्या आरोग्य यंत्रणेबाबत रु ग्ण व नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. उपजिल्हा रु ग्णालय आणि महालॅब यांच्यात समन्वय नसल्याचे समोर आले होते.
कारवाईच्या सूचना
यंत्रणा नादुरुस्तीसंदर्भात उपजिल्हा रु ग्णालय प्रशासनाने महालॅबकडे चौकशी केली असता कर्मचारी गैरहजर आढळून आले होते. सीबीसी तपासणी महालॅबमध्ये होणार नाही, असे महालॅबकडून उपजिल्हा रु ग्णालय प्रशासनाला कळविण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. महालॅबमधील संबधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची सुचना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही जिल्हा शल्य चिकित्सकांनी उपजिल्हा रु ग्णालय प्रशासनाला दिली आहे.