नांदूरवैद्य ग्रामपंचायतीकडून सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:39 PM2020-03-29T16:39:17+5:302020-03-29T16:40:12+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने तसेच गर्दी टाळून करता यावी यासाठी प्रत्येक किराणा दुकाने, भाजीपाला या ठिकाणी रंगाने एक मीटरच्या अंतरावर वर्तुळ आखले असून या वर्तुळातुनच वस्तू खरेदी करण्याचे आदेश ग्रामस्थांना दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे. या सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीचे व्यवस्थितरित्या पालन केले जात आहे.
नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने तसेच गर्दी टाळून करता यावी यासाठी प्रत्येक किराणा दुकाने, भाजीपाला या ठिकाणी रंगाने एक मीटरच्या अंतरावर वर्तुळ आखले असून या वर्तुळातुनच वस्तू खरेदी करण्याचे आदेश ग्रामस्थांना दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे. या सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीचे व्यवस्थितरित्या पालन केले जात आहे.
कोरोनासारख्या विषाणूपासून काळजी घेण्यासाठी विविध स्तरावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृतीचे काम सुरु असून यामध्ये नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक दुकानासमोर एक मीटरच्या अंतरावर रंगाने वर्तुळ तसेच काही ठिकाणी चौकट काढली आहे. या चौकटीत व वर्तुळातुनच ग्रामस्थांनी खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीने जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी दिलेल्या वेळेतच बाहेर पडावे अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आलेल्या आहेत.