एकादशीला कासवाच्या रांगोळीचे महत्व आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 07:28 PM2019-04-30T19:28:24+5:302019-04-30T19:28:36+5:30
मानोरी : महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या देव-देवतांची मंदीरे अिस्तत्वात आहे. अनेक देवांच्या अनेक प्रकारच्या आख्यायिका आजही कायम टिकून आहे.
मानोरी : महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या देव-देवतांची मंदीरे अिस्तत्वात आहे. अनेक देवांच्या अनेक प्रकारच्या आख्यायिका आजही कायम टिकून आहे.
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी या देवांची सुद्धा आख्यायिका असून एकादशीला सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. यात एकादशीला विठ्ठल आणि कासवाचे नाते अनोखे मानले जाते. एकादशीला कासवाच्या रांगोळीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
चौकट....
पूर्वीच्या काळी पंढरीचा विठ्ठल आणि गावकऱ्यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद निर्माण झाला होता. आणि या वादात विठ्ठलाचे हसणेच गायब झाले होते. त्यामुळे विठ्ठलाच्या या रागाला आवर कसा घालावा? विठ्ठलाच्या चेहºयावर हसू कसे आणता येईल? यासाठी गावकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. परंतु विठ्ठल कोणत्याही परिस्थितीत हसायला तयार होत नव्हते. त्यानंतर एकदा विठ्ठलाला हसू आणण्यासाठी संपूर्ण देवांची चर्चासत्र सुरु असताना या विठ्ठलाच्या व गावकºयांच्या वादाची बातमी एका कासवाला समजल्याने ते छोटेसे कासव न घाबरत देवांच्या बैठकीत हजर झाले. व थेट विठ्ठलाच्या पायथ्याशी जाऊन बसताच विठ्ठलाच्या चेहºयावर स्मित हास्य निर्माण झाले आणि विठ्ठल कासवाच्या आगमनाने हसल्याने कालांतराने विठूरायाने त्यांच्या पायथ्याशी कासवाला कायमस्वरूपी जागा दिली. म्हणून आज ही महाराष्ट्र ठिकठिकाणी प्रत्येक एकादशीला मंदिरासमोर कासवरूपी रांगोळी काढतात तर काही मंदिरासमोर कासवाची मुर्ती बसवतात.
याच परंपरेला कायम ठेवत मानोरी येथील मीना कोटमे व सीमा वावधाने या दोन महिलांनी महिन्याच्या, पंधरा दिवसाच्या तसेच प्रत्येक एकादशीला घरासमोर आणि मंदिरासमोर आकर्षक अशी कासवाची रांगोळीन चुकता काढत असतात.
(फोटो ३० मानोरी)