समाज उभारणीत शिक्षक महत्त्वाचा घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:14 AM2018-09-06T00:14:47+5:302018-09-06T00:23:43+5:30

नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठीदेखील शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही. समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.

Important component of community building society | समाज उभारणीत शिक्षक महत्त्वाचा घटक

समाज उभारणीत शिक्षक महत्त्वाचा घटक

googlenewsNext
ठळक मुद्देशीतल सांगळे : जिल्हा परिषदच्या गुणवंत शिक्षकांनापुरस्कारांचे वितरण

नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठीदेखील शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही. समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
प.सा. नाट्यगृह येथे आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण सभापती यतिंद्र पगार, बांधकाम सभापती मनीषा पवार, महिला बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, समाजकल्याण सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे उपस्थित होते.
ग्रामीण भागात सेवा करणारे शिक्षक नक्कीच आदर्शवत काम करीत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविताना शिक्षकांनी आपली मुले म्हणून ज्ञानदान केले पाहिजे, असेही सांगळे यांनी यावेळी म्हटले. जिल्हा परिषदेचे अनेक उपक्रम राबविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांचेदेखील योगदान असते हे विसरता कामा नये असे सांगून शिक्षकांनी अधिक सक्षमतेने कार्य केले पाहिजे, असेही सांगळे यांनी यावेळी सांगितले. शिक्षण सभापती यतिंद्र पगार यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. शिक्षक पुरस्कारांची निवड अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली असल्याचे सांगत अध्यापनाबरोबरच शिक्षकांचे इतर कामामध्येही महत्त्वाचे योगदान असल्याचे नमूद केले. गुणवंत शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शिक्षकांनी नवीन ज्ञान, कौशल्य आत्मसात करून आपल्यातील क्षमता ओळखून स्वत:ला प्रगल्भ केले पाहिजे असे सांगितले. धावपटू वर्षा चौधरी व ताई बामणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, डॉ. भारती पवार, महेंद्रसिंग काले, डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत शिरसाठ, सुरेश कमानकर, दीपक शिरसाठ, रोहिणी गावित, कान्हू गायकवाड, राजेश पाटील, पंडित अहेर, जगन्नाथ हिरे, निफाड पंचायत समिती सभापती राजेश पाटील, सदस्य पंडित आहेर, धर्मा देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकार यांनी केले तर आभार माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी मानले. शिक्षकांच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रल्हाद निकम व अनुराधा तारगे यांनी मनोगत व्यक्त केले.
आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी (२०१७)
१) खंडू नानाजी मोरे (देवळा)
२) दीपक रामभाऊ बागुल (सिन्नर)
३) अनुराधा रघुनाथ तारगे (दिंडोरी)
४) मनोहर लक्ष्मण महाले (पेठ)
५) नामदेव लक्ष्मण बेलदार (त्र्यंबकेश्वर)
६) संजय ताराचंद देवरे (नांदगाव)
७) संजय सोमनाथ येशी (नाशिक)
८) विजय प्रल्हादसिंग परदेशी (येवला)
९) हंसराज मधुकर देसाई (मालेगाव)
१०) नीलेश विनायक शिंदे (निफाड)
११) परशराम धनाजी गांगुर्डे (सुरगाणा)
१२) प्रकाश जगन्नाथ परदेशी (चांदवड)
१३) भास्कर मोतीराम बहिरम (इगतपुरी)
१४) नवनाथ दादा वटवल (इगतपुरी)
१५) किशोरकुमार भिकाजी मेधने (बागलाण)
आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी (२०१८)
१) गंगाधर पंडित लोंढे (देवळा)
२) सुभाष शंकर गवळी (सिन्नर)
३) दत्तात्रय विठ्ठल चौघुले (दिंडोरी)
४) भगवान महादू हिरकूड (पेठ)
५) देवसिंग धनसिंग बागुल (त्र्यंबकेश्वर)
६) दीपक कडू हिरे (नांदगाव)
७) प्रल्हाद राघो निकम (नाशिक)
८) सूरज छगन झाल्टे (येवला)
९) नूतन रमेश चौधरी (मालेगाव)
१०) शिवाजी निवृत्ती विंचू (निफाड)
११) शिवराम मोतीराम देशमुख (सुरगाणा)
१२) संजय हरी गवळी (चांदवड)
१३) बाबाजी मधुकर अहेर (कळवण)
१४) हरिश्चंद्र रायभान दाभाडे (इगतपुरी)
१५) सुंगध विष्णू भदाणे (बागलाण)
पुष्पगुच्छांना दिला फाटा यंदाच्या शिक्षकदिनी जिल्हा परिषदेने एक चांगला पायंडा पाडला. आदर्श शिक्षकांचा सत्कार करताना त्यांना पुष्पगुच्छ, हारतुरे न देता पुस्तके देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे उपस्थितांनीदेखील कौतुक केले.

Web Title: Important component of community building society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.