ल्टीडीआर घोटाळ्यातील महत्त्वाची फाइल गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:36 AM2020-09-23T01:36:03+5:302020-09-23T01:36:40+5:30
महापालिकेत गाजत असलेल्या सुमारे शंभर कोटी रूपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असतानाच महापालिकेत मात्र या प्रकरणात यापूर्वी सुरू झालेल्या चौकशीची महत्त्वपूर्ण फाइल गहाळ झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात शिवसेना आक्र मक झाली असून आता याप्रकरणाच्या मुळाशी जातानाच टीडीआर प्रकरणाशी संबंधीत कागदपत्रे आयुक्तांनी तातडीने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.
नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या सुमारे शंभर कोटी रूपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असतानाच महापालिकेत मात्र या प्रकरणात यापूर्वी सुरू झालेल्या चौकशीची महत्त्वपूर्ण फाइल गहाळ
झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात शिवसेना आक्र मक झाली असून आता याप्रकरणाच्या मुळाशी जातानाच टीडीआर प्रकरणाशी संबंधीत कागदपत्रे आयुक्तांनी तातडीने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात नाशिकरोड येथील सर्वे नंबर २९५ मधील शंभर कोटी रूपयांच्या टीडीआर संदर्भाात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात शासनाकडे तक्र ारी करण्यात आल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कोण कोण आहे, या खुलासा होण्याची शक्यता असतानाच महापालिकेत मात्र वेगळेच घडले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून गाजत असलेल्या या टीडीआर प्रकरणाची तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली होती. त्यांच्या आदेशावरून नगररचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांनी संबंधीत जागा मालकाला पाठविलेली नोटीस यासंदर्भातील कागदपत्रांची फाईलच गहाळ झाली आहे.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते तसेच शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे आणि याचिकाकर्ता अॅड. शिवाजी सहाणे यांनी चौकशी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे नोटिस आणि त्याला देण्यात आलेले प्रत्युत्तर याबाबत चौकशी केली. मात्र, फाईलचं गायब झाल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
गुन्हे दाखल करण्याची बोरस्ते यांची मागणी
महत्त्वाचे दस्तावेज असलेली फाइल गहाळच होते कशी प्रश्न करीत संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. प्रशासनातील अधिकारी एकमेकांना आणि जमिनमालकाला वाचिवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला आहे.