जालन्यात दोनशे बेकायदा पिस्तूलांची आयात; छगन भुजबळ यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 04:14 PM2023-12-25T16:14:41+5:302023-12-25T16:15:33+5:30
थोडं शिक्षण कमी असले तरी चालतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे असे भुजबळ म्हणाले.
मंत्री छगन भुजबळ आज त्यांचा मतदार संघ असलेल्या येवल्याच्या दौरावर आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भरवस फाट्याजवळ काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. त्यानंतर भुजबळ त्यांच्या येवला संपर्क कार्यालयावर आल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधून जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
जशी संस्कृती तशी टीका केली जाते. ज्याचे शिक्षण, संस्कृती जशी असेल तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतात. टीका करायला चांगले शब्द सापडतात ना?, चांगल्या शब्दाचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील. माणसाने सुसंस्कृत असेल पाहिजे. थोडं शिक्षण कमी असले तरी चालतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे असे भुजबळ म्हणाले. दोनशे बेकायदा पिस्तूलांची आयात जालना जिल्ह्यात झाली आहे, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला.
काही वाळूवाले, काही माफिया आजूबाजूला असतील तर ते तसेच शिकणार अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. ओबीसीतच घेईल हा अट्टाहास का ? सरकार जर हा अट्टाहास पूर्ण करायला लागता तर ओबीसीसुद्धा नाराज होतील. मराठा समाज मतदान करणार नाही म्हणत असेल तर, तसे ओबीसीवर अन्याय होईल, मग तेही मतदान करणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसीला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच आमची मागणी आहे. पहिल्यापासून आमचे तेच म्हणणे आहे, असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.