पावसाळी पर्यटन करताहेत...सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:37 AM2017-07-23T00:37:26+5:302017-07-23T00:37:38+5:30

नाशिक : हिरवाईने नटलेली डोंगररांग...सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे धबधबे... थंड वारा अन् पाऊसधारा अशा निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे.

Impressing rainy tour ... be careful! | पावसाळी पर्यटन करताहेत...सावधान !

पावसाळी पर्यटन करताहेत...सावधान !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : हिरवाईने नटलेली डोंगररांग...सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे धबधबे... थंड वारा अन् पाऊसधारा अशा निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे. ‘वीकेण्ड’ला पर्यटनाला जाताना सावधानता बाळगून सुरक्षितता राखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागासह पर्यटन विकास महामंडळाने केले आहे.  जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर, वणी, निफाड, पेठ अशा सर्वच भागांमध्ये मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे परिसर हिरवाईने नटला असून, सह्याद्रीच्या डोंगररांगेवरून धबधबे खळाळत आहेत. आजूबाजूच्या भात शेतीची खाचरे पाण्याने तुडूंब भरली आहेत.  परिसरात पावसाळी सहलीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. भावलीच्या गायवझरा, सुपवझरा या मोठ्या धबधब्यांसह अन्य लहान-मोठ्या धबधब्यांनी पर्यटकांना मोहिनी घातली आहे. शहरापासून ४० ते ५० किलोमीटर असलेल्या भावली परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्याचप्रमाणे अंजनेरी ते त्र्यंबकेश्वर व पहिणे, पेगलवाडी परिसरांतही गर्दी वाढत आहे. रविवारी (दि.२२) पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, पर्यटकांची गर्दीदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आषाढ अमावास्या असल्यामुळे तळीरामांकडून ओल्या पार्ट्या रंगविल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस, पर्यटन विभागाने ‘अलर्ट’ जारी केला आहे.
निसर्ग सौंदर्याला अस्वच्छतेचा ‘डाग’
 निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण या परिसरावर केली असली तरी या नैसर्गिक सौंदर्याला काही पर्यटक बेभानपणे वागून ‘डाग’ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यटकांकडून अस्वच्छता पसरविली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या, ग्लास, कॅरिबॅगचा कचरा पहावयास मिळतो. मद्यपींकडून फोडण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांच्या काचाही विखुरलेल्या दिसतात. पर्यावरणाला घातक असे प्रकार टाळण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Impressing rainy tour ... be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.