गावठी दारू अड्ड्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 04:03 PM2019-12-05T16:03:25+5:302019-12-05T16:03:32+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील मोराचा डोंगर भागात नाशिकच्या स्थानिक गुन्हा शाखेने टाकलेल्या दोन वेगवेगळे छापे टाकले.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील मोराचा डोंगर भागात नाशिकच्या स्थानिक गुन्हा शाखेने टाकलेल्या दोन वेगवेगळे छापे टाकले. या दोन्ही छाप्यात अवैध गावठी दारू आणि बनवण्याचे विविध साहित्य असे एकूण २ लाख ६४ हजारांचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला. संबंधित संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. इगतपुरी तालुक्यातील खैरगाव भागातील मोराचा डोंगर परिसरात अवैध गावठी दारू बनवली जात असल्याची खबर गुप्त बातमीदाराने पोलिसांना दिली. त्यानुसार नाशिकच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक ए. एल. वाघ, गुरु ळे, ठाकरे, जुंदरे, हांडगे, पिंगळ आदींच्या पथकाने अचानक 2 छापे घातले. यावेळी दारु तयार करण्याच्या 2 हातभट्ट्या आढळून आल्या. वेगवेगळ्या भट्ट्यांजवळ बसलेला गुणाजी भागाजी गांगड रा. खैरगांव आण िशांताराम रामा आघाण हे दोघेही पोलिसांची चाहूल लागताच डोंगरावर पळून गेले. पिहल्या घटनेत गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, १६ प्लास्टीक व लोखंडी ड्रम एकुण ३ हजार लिटर रसायन, १५ प्लास्टीक व १ लोखंडी ड्रम २०० लिटर मापाचे, तयार दारु १० लि., चाटु, लोखंडी पंखा, जळावु लाकडे असे १लाख ५७ हजार ३०० रु पयांचे साहित्य मिळुन आले. दुसर्या घटनेत दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्यात ११ प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये एकुण २ हजार लिटर
रसायन, १५ प्लास्टीक व १ लोखंडी ड्रम २०० लिटर मापाचे, तयार दारु ५ लि., चाटु, पातेले, जळाऊ लाकडे असे १ लाख ७ हजार ३०० रु पयांचे साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही घटनेतील साहित्याची एकूण किंमत २ लाख ६४ हजार आहे. स्थानिक गुन्हा शाखेने घोटी पोलिसांकडे दोन्ही घटनेची माहिती देऊन गुन्हा दाखल केला आहे.