इंदिरानगर, सातपूरमधील जुगार अड्डयांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:52 PM2018-09-09T17:52:47+5:302018-09-09T17:53:27+5:30
नाशिक : शहरातील जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
नाशिक : शहरातील जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
पाथर्डी फाट्यावरील नर्सरीच्या पत्र्याच्या शेडजवळ जुगार सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी (दि़८) रात्री छापा टाकला असता संशयित फिरोज शाबीराबी शेख, विकास जगन्नाथ पराते व त्यांचा एक साथीदार हे कल्याण मटका जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरा छापा सातपूर पोलिसांनी औद्योगिक वसाहतीतील महिंद्र मटेरियल गेट समोरील सप्तशृंगी हॉटेल मागे शनिवारी (दि़८) सायंकाळी टाकला़ याठिकाणी संशयित नितीन जाधव व त्याचे दोन साथीदार पत्यांच्या कॅटवर जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कुरापत काढून एकास जबर मारहाण
नाशिक - मागील भांडणाची कुरापत काढून सिडकोतील उत्तमनगरमधील रहिवासी जयेश बिरारी यास चार संशयितांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़८) दुपारी तोरणानगर शाळेजवळ घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी वैभव मुठेकर, गौरव पाटइल, विशाल देशमुख (रा़पवननगर) व शुभम पेंढारे (तोरणानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़
पाथर्डी फाटा परिसरातून दुचाकीची चोरी
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगरमधील रहिवासी शिवाजी पाटील (रा.गणजय अपा.) यांची ६० हजार रुपये किमतीची यामाहा (एमएच १५ एफआर २५६०) दुचाकी चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अंबड औद्योगिक वसाहतीतून दुचाकी लंपास
नाशिक : सिडकोतील स्वामी विवेकानंद नगरमधील रहिवासी देवराम दुसामेने यांची २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ ओजी २८००) चोरट्यांनी अंबड औद्योगीक वसाहतीतील आकांशा पॉवर कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : विनयनगरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि़७)सायंकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े