अवैध मद्यविक्री केंद्रांवर छापे
By Admin | Published: July 14, 2017 12:45 AM2017-07-14T00:45:22+5:302017-07-14T00:45:47+5:30
अवैध मद्यविक्री केंद्रांवर छापे कारवाई : सटाण्यात तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बुधवारी रात्री सटाणा शहरातील अवैध दारू विक्र ी केंद्रांवर पोलिसांनी छापेमारी करत पाच हॉटेल्समधून २२ हजार रु पयांचे देशी-विदेशी मद्य जप्त केले असून, तिघांना अटक केली आहे. शहरवासीयांनी या कारवाईचे स्वागत केले असून, या कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सटाणा शहरातील बहुतांशी हॉटेल्सवर अनधिकृतपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार शिंदे यांनी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट व पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत शहरातील हॉटेल्सवर छापे टाकत तब्बल पाच हॉटेल्समध्ये अनधिकृत दारू विक्री होत असल्याचे आढळून आली. मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे आणि सटाणा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी पोलीस कॉन्स्टेबल देवराम खांडवे, नवनाथ पवार, पुंडलिक डंबाळे, जिभाऊ बागुल, पन्नालाल बागुल, विजय वाघ, योगेश गुंजाळ, संदीप गांगुर्डे, शिरसाठ, खैरनार, भामरे यांनी ही कामगिरी केली.